दरारा 24 तास न्यूज नेटवर्क 👇
पोंभुर्णा तालुका काँग्रेस कार्यकर्त्यांची आढावा बैठक-
मान. संतोषसिंह रावत यांच्या उपस्थितीत आज महत्त्वपूर्ण सभा
पोंभुर्णा | प्रतिनिधी
तालुका काँग्रेस कमिटी पोंभुर्णा यांच्या वतीने दिनांक 02 जानेवारी 2026 (शुक्रवार) रोजी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची एक महत्त्वपूर्ण आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. सदर बैठक बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे काँग्रेस नेते माननीय संतोषसिंह रावत यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.
या बैठकीमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रातील सध्याची परिस्थिती, विकासकामांचा आढावा, जनतेच्या समस्या, तसेच आगामी राजकीय वाटचालीबाबत सखोल चर्चा करण्यात येणार आहे. पक्ष संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
ही आढावा सभा संताजी सभागृह, पोंभुर्णा येथे दुपारी ठीक 3 वाजता आयोजित करण्यात आली असून, तालुक्यातील सर्व काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला-युवा आघाडीच्या सदस्यांनी वेळेत आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
सदर बैठकीस
- वासुदेव पाल – तालुका काँग्रेस अध्यक्ष
- अशोक गेडाम – शहर काँग्रेस अध्यक्ष
- वैशाली बुरांडे – महिला काँग्रेस अध्यक्ष
- हेमंत आरेकर – युवा काँग्रेस अध्यक्ष, पोंभुर्णा
यांच्यासह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
तालुका व विधानसभा पातळीवरील राजकीय दिशा ठरविण्यासाठी ही बैठक निर्णायक ठरणार असल्याने, कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता दिसून येत आहे.
दरारा 24 तास न्यूज नेटवर्क
न्याय, विकास आणि लोकशाहीचा आवाज





0 टिप्पण्या
Thanks for reading