Advertisement

राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचा भव्य भूमिपूजन सोहळा संपन्न

दरारा 24 तास न्यूज नेटवर्क 👇



राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचा भव्य भूमिपूजन सोहळा संपन्न

जुनगाव येथे मान्यवरांच्या उपस्थितीत ऐतिहासिक क्षण

पोंभुर्णा (जुनगाव) | प्रतिनिधी

राज्याचे आराध्य दैवत, स्वराज्याचे संस्थापक राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या उभारणीसाठी जुनगाव येथे दिनांक 04 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10.05 वाजता भव्य व उत्साहपूर्ण वातावरणात भूमिपूजन सोहळा संपन्न झाला.

या ऐतिहासिक प्रसंगी ग्रामपंचायत जुनगावचे सरपंच तथा भाजपा तालुका उपाध्यक्ष पोंभुर्णा श्री. राहुलभाऊ पाल यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. कार्यक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून संपूर्ण गाव शिवमय वातावरणात न्हाऊन निघाले होते.


या वेळी श्री. पांडुरंग पा. पाल, श्री. प्रफुलचंद चुदरी (तंटामुक्ती अध्यक्ष), श्री. तेजपाल रंगारी, श्री. विश्वेश्वरराव भाकरे, तसेच सौ. सोनी चंद्रकांत चुदरी, सौ. पल्लवीताई किशोर देशभूख, सौ. माधुरीताई प्रकाश झबाडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाला सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. यामध्ये माजी सरपंच व पत्रकार श्री. जिवनंदास गेडाम, श्री. गजानन पा. येलपुलवार, श्री. सुखदेव पा. नागापुरे, श्री. खुशालभाऊ भोयर, श्री. लक्ष्मण पा. घोगरे, श्री. खुशाल मु. पाल, श्री. सुधाकर आभारे, श्री. रविंद्र घोटेकर, श्री. विलास पा. पाल, श्री. दिलीप घोगरे, श्री. विकास पाल, श्री. गजानन पाल, श्री. सुनिल कालेस्वरवार, श्री. साईनाथ पा. चुदरी, श्री. राकेश चिंचोलकार, श्री. सुखदेव चुदरी, श्री. गुरुदास चुदरी, श्री. किशोर खोब्रागडे, श्री. निळकंठ पा. पाल, श्री. विलास पा. जवादे, श्री. मारोती गेडेकर, श्री. बाळूजी पोरटे, श्री. एकनाथ येलेकर, श्री. संतोष गेडाम, श्री. कालिदास वाळके, श्री. मनोज भोयर, श्री. पुनाजी म्हशाखेत्री, श्री. सुखलाल खोब्रागडे, श्री. सुरेश मेश्राम, श्री. प्रमोद चुदरी, श्री. सुरेश पाल, श्री. रमेश पाल, श्री. रुषीजी म्हशाखेत्री, श्री. शालिक चुदरी, श्री. दादाजी सदोकार, श्री. वामन सदोकार, श्री. जगन्नाथ चिंचोलकार, श्री. प्रकाश भाकरे, श्री. साईनाथ गोहणे, श्री. बंडू पा. पाल, श्री. बंडू मेश्राम आदींचा समावेश होता.

तसेच सौ. आशाताई झाडे, सौ. संगिताताई झबाडे, सौ. छायाबाई धोटे, सौ. उज्वलाताई दुधनवार यांच्यासह समस्त गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य, दूरदृष्टी, लोककल्याणकारी राज्यव्यवस्था आणि आदर्श नेतृत्वावर प्रकाश टाकला. स्मारकाच्या माध्यमातून पुढील पिढीला इतिहासाची प्रेरणा मिळेल, असे मत वक्त्यांनी व्यक्त केले.


कार्यक्रम शांततामय व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. भूमिपूजन सोहळ्याने गावात एकतेचे, अभिमानाचे आणि स्वराज्याच्या विचारांचे वातावरण निर्माण झाले.

या कार्यक्रमाला घडवून आणण्यासाठी अतुल चौधरी, शुभम रघुनाथ पाल, व त्यांच्या टीमचे टीमचे अत्यंत मोलाचे सहकार्य लाभले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या