Advertisement

🚨 धडक कारवाई | जनावरांच्या कत्तलीचा कट पोलिसांनी उधळला मृत्यूच्या दाढेतून 14 बैलांची सुटका, पोंभुर्णा पोलिसांची मोठी कामगिरी

 


🚨 धडक कारवाई | जनावरांच्या कत्तलीचा कट पोलिसांनी उधळला

मृत्यूच्या दाढेतून 14 बैलांची सुटका, पोंभुर्णा पोलिसांची मोठी कामगिरी

चंद्रपूर | जीवनदास गेडाम 

पोंभुर्णा तालुक्यातील घाटकुळ बस स्थानक परिसरात कत्तलीसाठी निर्दयपणे नेण्यात येत असलेल्या मुक्या जनावरांची अमानुष मृत्यूयात्रा पोंभुर्णा पोलिसांनी मध्यरात्री थांबवत मानवतेचा विजय घडवून आणला. अन्न-पाण्याविना, दोरीने बांधलेली व जखमी अवस्थेतील बैल मृत्यूच्या उंबरठ्यावर असताना पोलिसांच्या धडक कारवाईमुळे त्यांना नवजीवन मिळाले.

गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवत छापा टाकला. तपासादरम्यान कत्तलीसाठी बैलांची बेकायदेशीर वाहतूक सुरू असल्याचे स्पष्ट झाले. हा प्रकार केवळ कायद्याचा भंग नसून माणुसकीवरचा काळा डाग असल्याची तीव्र प्रतिक्रिया पोलिस सूत्रांनी दिली.

⚖️ कायद्याची भीती नाही, जीवाची किंमत शून्य

तस्करांनी नियम, कायदे आणि नैतिकता पायदळी तुडवत जनावरांची कत्तलीकडे वाहतूक केली होती. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत 14 बैल ताब्यात घेऊन 5 आरोपींना अटक केली.
आरोपींविरुद्ध खालील कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे –

  • महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा 1976
  • प्राण्यांचा छळ प्रतिबंध अधिनियम 1960 कलम 11(1)(a), 11(1)(h)
  • महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 कलम 119
  • भारतीय दंड संहिता व इतर संबंधित गंभीर कलमे

🚓 पोलिसांची करारी भूमिका, तस्करांमध्ये खळबळ

या कारवाईमुळे परिसरातील जनावरांची बेकायदेशीर कत्तल व तस्करीचे जाळे उघड होण्याची शक्यता असून तपास अधिक तीव्र करण्यात आला आहे. वाचवलेल्या बैलांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.

ही संपूर्ण कारवाई
मा. सुदर्शन साहेब (पोलीस अधीक्षक, चंद्रपूर),
मा. ईश्वर कातकडे साहेब (अपर पोलीस अधीक्षक, चंद्रपूर),
मा. सत्यजीत आमले साहेब (उपविभागीय पोलीस अधिकारी, मुल)

यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

कारवाईत
स.पो.नि. राहुल ठेंगणे (प्रभारी अधिकारी, पो.स्टे. पोंभुर्णा),
पो.हवा. नरेश निमगडे (ब.नं. 2527),
पो.हवा. पंजाबराव मडावी (ब.नं. 2425),
पो.अं. जगदिश पिपरे (ब.नं. 228),
पो.अं. अमलेश (ब.नं. 291),
पो.अं. प्रफुल (ब.नं. 12)

यांनी सक्रिय सहभाग घेतला. पुढील तपास पो.हवा. हरिंद्रकुमार भारती करीत आहेत.

👥 अटक आरोपींची नावे

  1. विश्वनाथ धर्मजीत अर्जुनकार (वय 44)
  2. पत्रु सुकरू बट्टे (वय 65)
  3. भोजराज कवडु चनेकार (वय 54)
  4. विशाल महादेव चिंचोलकर (वय 30)
  5. बंडु अर्जुनकार (वय 48)
    (सर्व रा. फुटाणा (मोकाशा), ता. पोंभुर्णा, जि. चंद्रपूर)

🐂 जप्त मुद्देमाल

  • 14 नोवंशीय बैल
  • अंदाजे किंमत : ₹3,50,000/-

👉 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या