पोंभूर्ण्यातून चालतो सुगंधीत तंबाखूचा गोरख धंदा, कोट्यावधी ची उलाढाल प्रशासन बेखबर!

पोंभूर्ण्यातून चालतो सुगंधीत तंबाखूचा गोरख धंदा, कोट्यावधी ची उलाढाल प्रशासन बेखबर! जीवनदास गेडाम (विशेष प्रतिनिधी) पोंभुर्णा - चंद्रपूर जिल्हाचे पालकमंत्री नाम.सुधीर मुनगंटीवार यांच्या विधानसभा मतदार संघात अनेक अवैद्य धंद्याचे मोठमोठे घबाड समोर आले आहेत. त्यात बल्लारपूर टोलनाका वरिल बेकायदेशीर सुगंधित तंबाखूच्या होणाऱ्या वाहतूकीवर झालेली कारवाई सध्या ज्वलंत उदाहरण आहे. मग ते मुल तालुका असो वा पोंभूर्णा यातून सुटलेला नाही. पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या विधानसभा मतदार संघात सुगंधित तंबाखू ची खुलेआम वाहतूक व विक्री असो की येथून कत्तली करिता परराज्यात होत असलेली जनावरांची वाहतूक व विक्री असो. त्याहीपलिकडे गौण खनिजाची सर्रास लुट असो असे एक नाही तर कितितरी अवैद्य धंद्याचे मोठमोठे घबाड येथे सक्रीय आहेत. परंतु पोंभूर्णा तालुक्यात वास्तव चित्र मात्र काही वेगळेच आहे. पोंभूर्ण्याचा कालचा चिंधिछाप 'लेक' सुगंधित तंबाखूच्या अवैद्य व्यवसायातून आजचा कोट्याधीश झाला. हे चित्र जनतेच्या नजरेतून सुटलेले नाही. मात्र हा सुगंधित तंबाखूचा करोडोचा गोरखधंदा स्थानिक पोलीस प्रशासन व अन्न औषध प्रशासनाच्या ...