*नांदगाव येथे क्रिकेटचा आज पासून महासंग्राम*
*राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार तथा शिवानीताई वडेट्टीवार यांची प्रमुख उपस्थिती*
*मुल (अजित गेडाम):-* विजय भाऊ वडेट्टीवार फॅन्स क्लब नांदगाव यांच्या अनुषंगाने नांदगाव टेनिस प्रीमियर लीग-२०२३ दिनांक ९ नोव्हेंबर पासून नांदगाव येथील सिंधलताई राठोड आदिवासी आश्रम शाळेच्या पटांगणात क्रिकेटचा रात्र कालीन महासंग्राम आयोजित केलेला आहे.
दीपावलीच्या शुभ पर्वतावर दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मोठ्या जल्लोषात रात्रकालीन क्रिकेटचे तिसरे महापर्व विजयभाऊ वडेट्टीवार फॅन्स क्लब नांदगाव द्वारा आयोजित केलेला आहे. या प्रीमियर लीगचे उद्घाटन राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, शिवानी वडेट्टीवार, आमदार तथा जिल्हाध्यक्ष काँग्रेस सुभाष भाऊ धोटे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत, शंतनू धोटे जिल्हाध्यक्ष युवक काँग्रेस यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या सामन्याला प्रथम पुरस्कार ८८८८८ हजार रुपये, द्वितीय पुरस्कार ६६६६६ हजार रुपये, तृतीय पुरस्कार ४४४४४ हजार रुपये ठेवण्यात आलेला आहे. उद्घाटनिय समारंभाला नांदगाव नगरीत प्रथमच सुनिकेत बींगेवार रणजी ट्राफिक खेळाडू विदर्भ तथा प्रसिद्ध सेलिब्रिटी आशिष बोबडे चीमुरका छोकरा युट्युबर प्रमुख आकर्षण म्हणून उपस्थित राहणार आहेत. परिसरातील जास्तीत जास्त क्रिकेट संघानी यामध्ये नोंदणी नोंदवली असून यावर्षीचा क्रिकेटचा महासंग्राम जल्लोषात होणार आहे. सदर प्रिमियर लीगचे आयोजन विजयभाऊ वडेट्टीवार फॅन्स क्लबचे दशरथभाऊ वाकुडकर, अभिजीत वाकुडकर, शुभम अल्लीवार, स्वप्निल लेनगुरे, अभिनंदन दुर्गे, आशिष भंडारी, सचिन गिरडकर, अमित वाडगुरे तथा इतर क्रीडा व्यवस्थापकानी केले आहे.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
0 Comments