पोस्ट्स

बल्लारपूर विधानसभेत संतोष सिंह रावत यांचा जलवा

इमेज
बल्लारपूर विधानसभेत संतोष सिंह रावत यांचा जलवा मुल: संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या बल्लारपूर विधानसभेत भाजपा विरुद्ध काँग्रेस अशी काट्याची टक्कर होणार असल्याचे चित्र दिसत आहे.  भारतीय जनता पक्षाने राज्याचे वजनदार मंत्री नामदार सुधीर मुनगंटीवर यांना उमेदवारी दिली आहे.आणी  ते प्रचारात आघाडी घेऊन आहेत. मात्र काँग्रेस पक्षाने ऐन वेळेवर उमेदवारी वाटपाचा तिढा सोडवला. आणि चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष सिंह रावत यांना उमेदवारी जाहीर केली.  त्यांनी काल शक्ती प्रदर्शन करत मुलं येथील उपविभागीय कार्यालयात काँग्रेस पक्षाच्या अधिकृत चिन्हावरून अर्ज दाखल केला. यावेळी संपूर्ण मूल शहर काँग्रेसमय झालेले दिसले. प्रचंड प्रमाणात आलेल्या महिला व पुरुष कार्यकर्ते जोशाने रॅलीत सहभागी झालेले दिसले.  मूलमध्येच नव्हे तर चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक भागात संतोष सिंह रावत यांच्या कालचा रॅलीची चर्चा ऐकायला मिळत आहे. त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर इंडिया आघाडीच्या सर्व घटक पक्षांनी सुद्धा त्यांना समर्थन व सहकार्य करण्याची भूमिका स्पष्ट केल्याचे सूत्रांनी...

चंद्रपूर जिल्हा युवा सेनेची बैठक संपन्न

इमेज
आज दिनांक 24-10-2024 रोजी युवासेना प्रमुख श्री आदित्य साहेब ठाकरे , शिवसेना युवासेना सचिव श्री वरुणजी सरदेसाई साहेब आदेशाने व युवासेना कार्यकारणी सदस्य श्री हर्षल दादा काकडे , युवासेना पूर्व विदर्भ विभागीय सचिव श्री निलेशजी बेलखेडे चंद्रपूर युवासेना विस्तारक श्री संदीपजी रियाल पटेल यांच्या मार्गदर्शनात व युवासेना जिल्हाप्रमुख श्री विक्रांत भाऊ सहारे यांच्या नेतृत्वात चंद्रपूर युवासेना पदाधिकारी व युवासैनिक यांची आढावा बैठक पार पडली असून या बैठकीत सर्व युवासैनेच्या पदाधिकारी व युवासैनिक यांनी असा निर्धार केली कि चंद्रपूर चे लाडके जिल्हाप्रमुख श्री संदीपभाऊ गिऱ्हे यांच्या सोबत कोणत्याहि कुठल्याही परिस्थिती मध्ये साथ द्याची आहे व संपूर्ण ताकदीने युवासैनिक भाऊच्या पाठीमागे उभे रहावे असा संदेश विक्रांत भाऊ सहारे व इतर पदाधिकारी यांनी एक मताने केला वचन दिले चंद्रपूर जिल्हा युवा सेनेची बैठक संपन्न यावेळी उपस्थित माझे सहकारी 👇🏻👇🏻👇🏻 युवासेनेचे जिल्हाचिटणीस सुमितभाऊ अग्रवाल उपजिल्हा अधिकारी बंटी भाऊ कमटम, तालुका प्रमुख सूरज शेंडे ,शहर प्रमुख शाहबाज शेख, शहर प्रमुख वैभव काळे , शहर प्रमुख चे...

बिल्डर संजय पाटील यांची धार धार शस्त्राने भोसकून हत्या

इमेज
शिवाजीनगर पोलिस स्टेशन च्या परिसरात रातभर अनधिकृत बेकायदेशीर अवैध धंदे जसे, ढाबे, डान्सबार, पाब, हुक्का पार्लर, जुगार अड्डे, गांजा द्रग्ज विक्री, क्रिकेट फुटबॉल टर्फ, व इतर चालू असतात आणि विशेष माहितीनुसार पोलिसांच्या आशीर्वादाने इकडे द्रग्ज विकणारे पेडलार्स बिनधास्त गांजा, चरस, एमदी, गुटका व इतर व्यसन पदार्थ विकून पोलिसांना त्यातून वाटा देतात अशी १००% खात्रीची माहिती आहे. म्हणूनच असे खतरनाक मर्डर या परिसरात होत आहे. डीसिपी, एसीपी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक व इतर पोलीस अधिकारी भ्रष्टाचारी करून हफ्ते खाऊनही लोकांना न्याय देण्याचे काम करतात की नाही हा मोठा आहे..... आता या घडलेल्या मर्डर च्या गुन्ह्यात आरोपींना पकडतात की त्यांना लपण्यासाठी मदत करतात हे ही मोठे प्रश्न आहे....... जगदीश का. काशिकर, मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार - नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

नुकसानीचे पंचनामे तात्काळ करा-सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष भालचंद्र बोधलकर यांची मागणी

इमेज
नुकसानीचे पंचनामे तात्काळ करा-सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष भालचंद्र बोधलकर यांची मागणी पोंभुर्णा: (प्रतिनिधी) तालुक्यातील , अनेक गावात व तहसील मंडळात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे पंचनामे करून प्रस्ताव तात्काळ शासन स्तरावर पाठवा असे अशी मागणी सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष व माजी सरपंच जामतुकुम यांनी केली आहे. भालचंद्र बोधलकर तालुका तालुका अध्यक्ष सरपंच संघटना तथा माजी सरपंच तालुक्यातील सर्व तहसील मंडळातील शेतकऱ्यांचे धान (भातपीक)कापूस, मका, सोयाबीन, पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यास्तव तहसील मंडळात अतिवृष्टीचे पंचनामे करण्याचे आदेश करावे व अतिवृष्टी नुकसान भरपाईचा अहवाल शासन स्तरावर पाठविण्यात यावा अशी मागणी बोधलकर यांनी केली आहे.

*संतोष भाऊ रावत यांनी दिला कॅन्सरग्रस्त महीलेला मदतीचा हात*

इमेज
*संतोष भाऊ रावत यांनी दिला कॅन्सरग्रस्त महीलेला मदतीचा हात*   *पोभुंर्णा:-* शहरातील सौ.लता शालीक दुधबळे यांना कॅन्सरग्रस्त आजाराने ग्रासलेले आहे. त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने एक छोटासा मदतीचा हात म्हणून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संतोष रावत यांच्या मार्गदर्शनात काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मदतीचा हात म्हणून आर्थिक सहाय्य केले. कॅन्सरग्रस्त महिलेला आर्थिक सहाय्य देताना युवक काँग्रेसचे प्रशांत उराडे, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष पवन निलमवार, पोभुंर्णा काँग्रेस तालुका अध्यक्ष वासुदेवजी पाल, काँग्रेसचे नेतेओमेश्वर पद्मगिरीवार, अशोकजी गेडाम,अमर घुगे, आनंदराव पातळे, ऋषी पुल्लकवार, पराग मुलकलवार, राहुल देवतळे, नंदू बुरांडे, रुपेश पुडके, राजू बोलमवार, धम्मा निमगडे, दिवाकर गुरूनुले, रफिक शेख तथा काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.

शहीद वीर बाबुराव शेडमाके यांना आदरांजली* *@पोंभूर्णा आदिवासी समाजाच्या वतीने कार्यक्रम सपन्न*

इमेज
*शहीद वीर बाबुराव शेडमाके यांना आदरांजली* *@पोंभूर्णा आदिवासी समाजाच्या वतीने कार्यक्रम सपन्न* पोंभूर्णा: राष्ट्रीय क्रांतिकारी शहीद योद्धा वीर बाबुराव पुल्लेश्वर शेडमाके यांनी वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी इंग्रजाविरुद्ध आवाज उठविला. त्यांच्या संघर्षाचे योगदान समाजाला सदैव स्मरणात राहावे यासाठी दरवर्षी शहीद दिन आयोजीत केला जाते. पोंभुर्णा आदिवासी चौक येथे सोमवार ला 167 वा शहीद दिन कार्यक्रम पार पडला. यावेळी विर बाबुराव शेडमाके यांच्यावर चंद्रपूर गिरणार चौकाला लागून असलेल्या तुरंग परिसरातील पिंपळाच्या झाडाला विर बाबुराव शोेडमाके यांना इंग्रजांनी २१ ऑक्टोबर १९५८ रोजी फासावर लटकविले होते शहीद विर बाबुराव पुल्लेश्वर शेडमाके यांच्या कार्यावर प्रकाश नगरसेवक आशिष कावटवार यांनी टाकला.  तर क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांच्या जीवन कार्यावर व त्यांचा क्रांतिकारी इतिहासावर व घोट, गोंडपिपरी पोंभुर्णा, मुल तालुक्यात वीर बाबुराव शेडमाके यांनी केलेला पराक्रमावर सखोल मार्गदर्शन आदिवासी समाजाचे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते महेंद्र शेडमाके यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले. आदिवासी समाजाच्या आयोजित 167 व...

वरोरा-भद्रावती विधानसभा तिकीटासाठी शिवसैनिकांची जोरदार मागणी, मुकेश जीवतोडेंच्या उमेदवारीसाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आवाहन

इमेज
वरोरा-भद्रावती विधानसभा तिकीटासाठी शिवसैनिकांची जोरदार मागणी, मुकेश जीवतोडेंच्या उमेदवारीसाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आवाहन महेश निमसटकर तालुका प्रतिनिधि भद्रावती  भद्रावती दि.21:' महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या (काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीत 75 वरोरा-भद्रावती विधानसभा मतदारसंघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वाट्याला यावा, अशी जोरदार मागणी उचलली जात आहे. आज शिवसेना जिल्हा संपर्क कार्यालयात मोठ्या संख्येने जमलेल्या शिवसैनिकांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आवाहन करत मुकेश जीवतोडे यांना उमेदवारी देण्याची मागणी केली. शिवसैनिकांनी घोषणाबाजी करत, "75 वरोरा-भद्रावती शिवसेनेच्या वाट्याला आलीच पाहिजे!" आणि "मुकेश जीवतोडेंना तिकीट मिळालेच पाहिजे!" अशा आवाजात आपली मागणी व्यक्त केली. शिवसैनिकांचे म्हणणे आहे की, मुकेश जीवतोडे यांनी वरोरा-भद्रावती मतदारसंघात शिवसेनेचे संघटन मजबूत केले आहे आणि त्यांच्या नेतृत्वात अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत. युवकांना रोजगार मिळवून देणे, शेतकरी आणि व...