पोस्ट्स

सप्टेंबर, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

चंद्रपूरात तीन मजली इमारत कोसळली, सुदैवाने जीवितहानी नाही! आ. किशोर जोरगेवारांची घटनास्थळाला भेट!

चंद्रपूर - स्थानिक घुटकाळा वार्डातील जिर्ण अवस्थेत असलेली इमारत कोसळल्याची घटना आज दुपारी दिड वाजताच्या सुमारास घडली. सदरहु घटनेत शाहिस्ता खान नामक महिला मल्याम्याखाली दबल्या गेली होती. या घटनेची माहिती मिळताच चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच यावेळी मलब्याखाली दबलेल्या महिलेला वैद्यकीय मदत करण्याच्या सुचना अधिकारी वर्गांना त्यांनी केल्या.तसेच आ.जोरगेवार यांनी पिडीत कुटूंबाला आर्थिक मदत केली.  चंद्रपूर शहरात घुटकाळा वार्डात पटेल नामक तिन मजली इमारत आहे. सदरहु इमारतीचे बांधकाम जुने असल्याने इमारत जिर्ण झाली होती. या इमारतीत शेख कुटुंबीय वास्तव्यास आहे. मात्र आज दुपारच्या दरम्यान इमारत खाली कोसळली या घटनेत शाहिस्ता खान नामक महिला इमारतीच्या मलब्या खाली दबल्या गेली. घटनेची माहिती मिळताच आमदार जोरगेवार यांनी घटनास्थळ गाठले. तेव्हा महिलेला बाहेर काढण्याचे प्रयत्न प्रशासनाच्या वतीने सुरु होते. काही वेळात महिलेला सुखरुप बाहेर काढण्यात आले. सदरहु महिलेला शक्य ती वैद्यकीय मदत तात्काळ उपलब्ध करुन देण्याच्या सुचना आमदार जोरगेवार यांनी संबधि...

राज्यात 44 आयएएस अधिकारी यांच्या बदल्या! बघा कोण कुठे अधिकारी

इमेज
मुंबई : राज्यातील ४४ आयएएस आधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत, त्यामुळे राज्यातील अनेक विभागाचा कारभार बदलणार आहे. या बदल्यांमध्ये रोहन घुगे यांच्याकडे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हापरिषद, वर्धा ही जबाबदारी देण्यात आली आहे*. प्रदीप व्यास यांची अप्पर मुख्य सचिव आदिवासी विकास पदी बदली करण्यात आली आहे. संजय खंदारे यांची बदली प्रधान सचिव सार्वजनिक आरोग्य विभागात झाली असून अश्विनी जोशी यांना सचिव वैद्यकीय शिक्षण आणि औषध प्रशासन मंत्रालय, निलेश घटने यांना चिफ एक्झिक्यूटीव्ह ऑफिसर SRA, पुणे येथे बदली देण्यात आली आहे. तसेच मिलिंद म्हैसकर यांना प्रधान सचिव विमान चलन आणि राज्य उत्पादन शुल्क,अनुप कुमार यांना अल्पसंख्यांक सचिव, तर ए. आर. काळे यांच्याकडे अन्न प्रशासन आयुक्त पदाचा पदभार देण्यात आला आहे. हर्षदीप कांबळे प्रधान सचिव उद्योग, ऊर्जा कामगार, लीना बनसोडे यांच्याकडे अतिरिक्त आयुक्त आदिवासी विकास, ठाणे हा पदभार असणार आहे. कौस्तुभ दिवेघावकर हे प्रकल्प संचालक, बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय ग्रामविकास, पुणे तर देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू प्रवीण दराडे पर्यावरण विभागात सचिव म्हणून काम पाहतील. आधि...

मुदखेड बेंबर रोड टि पोईट ला अंद्याक्रांतीकार राघोजी भांगरे चौक नामकरण करावे अशी मागणी.महाराष्ट्र प्रदेश महासचिव विजयकुमार मोरे यांची मागणी..

इमेज
आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक महान क्रांतीकारक होते त्यांचा जन्म १८ नोव्हेंबर १८०५ रोजी एका महादेव कोळी परिवारात झाला त्यांचे मूळ गाव देवगाव तालुका अकोले जिल्हा अहमदनगर भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात राघोजी भांगरे यांचे मोठे योगदान होते अशा महापुरुषाचे मुदखेड ते बेंबर रस्त्यावर असलेल्या चौकाला देण्यात यावे व नामकरण करण्यात यावे अशा पद्धतीचे निवेदन कार्यकर्त्यांनी भोकरच्या तहसीलदासह उपविभागीय अधिकारी यांनी आदिवासी विकास संघटना महाराष्ट्र राज्य प्रदेश सचिव विजय कुमार पाटील मोरे यांनी मागणीचे निवेदन दिले आहें परकीय सत्ते विरोधात लढणा-या आदिवासी बंडखोरांमध्ये राघोजी भांगरे हा एक भक्कम, ताकदवान आणि धाडसी बंडखोर नेता होता पेशवाई बुडाल्या नंतर इंग्रजांनी महादेव कोळ्यांचे सह्याद्रीतील किल्ले, घाटमाथे राखण्याचे अधिकार काढून घेतले होते किल्ल्याच्य शिलेदारी वतनदारी काढल्या होत्या बुरूज नष्ट केले होते पगारी देणे कमी केले होते इंग्रजांनी परंपरागत अधिकार काढून घेतल्याने महादेव कोळ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला होता त्याच कालावधीत शेतसारा वाढवण्यात आला होता शेतसारा वसुल...

भाजपचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गणवेश वितरण देवडा बुज. येथे झाला कार्यक्रम, मान्यवरांची उपस्थिती

इमेज
चंद्रपूर : पोभुर्णा पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या देवाडा बुज. येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना दि 27/9/2022 रोजी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भाऊ भोंगळे यांच्या शुभहस्ते गणेश वितरण सोहळा नुकताच पार पडला. यावेळी गावचे सरपंच सौ माधुरी चुदरी , पंचायत समितीचे माजी उपसभापती विनोद देशमुख , भाजपा मोर्चा अध्यक्ष अजय मस्के, जुंनगाव येथील उपसरपंच तथा भाजपा युवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष राहुल पाल, भाजपा कार्यकर्ते तथा उपसरपंच नैलेश चिंचोलकर , माजी सरपंच तुळशीराम रोहनकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रेवनाथ मिसार, उपाध्यक्ष सरजना मेश्राम, शाळेचे मुख्याध्यापक शंकर आत्राम, सामाजिक कार्यकर्ते विकास शेडमाके, भोजराज मिसार, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य चेतन आरेकार,सुनिल सोपनकार इत्यादी मान्यवर मंडळी कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित होते.

घोसरी येथील स्मशानभूमीचे बांधकाम प्रलंबित! दफनविधीसाठी ग्रामस्थांना अंत्ययात्रा घेऊन जावे लागते लाल हेटीच्या स्मशानभूमीत

इमेज
विजय जाधव, नांदगाव: चंद्रपूर जिल्ह्यात शहरी भागात मोक्षधाम तर ग्रामीण भागात स्मशानभूमी शेड उभारण्यात आले आहेत. स्मशानभूमी साठी शासनाकडून विविध योजनांच्या माध्यमातून ग्रामपंचायतींना थेट निधीची सुद्धा पूर्तता केली जाते. अनेक गावात स्मशानभूमी शेड उभारण्यात आले आहेत. परंतु पोंभुर्णा तालुक्यातील राजकीय दृष्ट्या अतिशय संवेदनशील समजल्या जाणाऱ्या घोसरी या गावात ही योजना अपवाद ठरल्याचे दिसून येत आहे. सन 2018 ते 19 या वर्षात गावात स्मशानभूमीच्या बांधकामासाठी जन सुविधा योजना अंतर्गत 4 लक्ष 88 हजार 660 रुपयांचा निधी मंजूर झाला. परंतु तत्कालीन ग्रामपंचायत कमिटीच्या उदासीनतेमुळे सन 2018 पासून स्मशान भूमी शेडचे बांधकाम अपूर्ण आहे. ग्रामपंचायतीला संपूर्ण निधी प्राप्त झाला. ग्रामपंचायत स्तरावरून कंत्राट दारा मार्फत सदर कामाला सुरुवातही करण्यात आली परंतु अजूनही काम पूर्ण झाले नाही. आणि वाजवीपेक्षा जास्त कामाची देखील कंत्राटदाराला अदा करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. निधी प्राप्त होऊ नये काम पूर्णत्वास आले नाही. त्यामुळे ग्रामस्थांना अंत्यविधीसाठी स्मशानभूमी अभावी कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. नाई...

जिवती येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुर्नाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा संपन्न.

इमेज
जिवती :-- जिवती येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा मोठय़ा उत्साहात पार पडला. सर्वप्रथम सकाळी १० : ३० वाजता समितीचे अध्यक्ष सुग्रीव गोतावळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. जिवती येथील पंचशील ध्वज ते अण्णाभाऊ साठे पुतळ्याचे ठिकाणापर्यंत मोटारसायकल रॅली, प्रभात फेरी काढण्यात आली. यानंतर दुपारी २:३० वाजता साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुर्नाकृती पुतळ्याचे अनावरण व मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्राचे माजी गृहराज्यमंत्री रमेशदादा बागवे होते तर प्रमुख अतिथी लोकप्रिय खासदार बाळुभाऊ धानोरकर, आमदार सुभाषभाऊ धोटे, माजी नगराध्यक्ष अरुणभाऊ धोटे, मातंग समाज समन्वय समितीचे अध्यक्ष सुग्रीव गोतावळे, कलाम साहेब, के. मूर्ती, डॉ. मिलिंद शिखारे, नरसिंग मोरे, नगराध्यक्ष कविता आडे, अमर राठोड, संजय कथाडे, राजू येले, गणपत आडे, महेश देवकते, विनोद दत्तात्रेय, आनंद भालेराव, प्रकाश कांबळे, नगरसेविका सतलुबाई जुमनाके, पुष्पाताई नैताम, अनिता गोतावळे, जी एस कांबळे, उद्धव कांबळे, डॉ. अंकुश गोतावळे उपनगराध्यक्ष, देविदास कांब...

लंपी आजाराविषयी शेतकऱ्यांनी दक्षता घ्यावी- भाजपा पोंभुर्णा चे पशुपालकांना आवाहन

इमेज
पोंभुर्णा: प्रतिनिधी       पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा अंधार वाडा कार्यक्रम तालुक्यात राबवण्यात आला. बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार तथा राज्याचे वने व सांस्कृतिक कार्यमंत्री आणि चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सूचनेनुसार तालुक्यात गुरांवरील लंपी आजाररावर प्रतिबंधात्मक लस गावागावात देण्यात यावी याविषयी जाणीव जागृती व्हावी याकरिता चिंतन धाबा या गावापासून लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. जनावरांचे गोठे फवारणी करून स्वच्छ आणि साफ करणे यासह काळजी घेण्याचे आवाहन भाजपच्या वतीने करण्यात आले आहे.       https://youtube.com/shorts/j7odzSC-Sa4?feature=share https://youtube.com/shorts/j7odzSC-Sa4?feature=share यावेळी चिंतलधाबा गावात ३२१ रोग प्रतिकार लस देण्यात आली.       यावेळी भाजपच्या जिल्हा अध्यक्ष महिला आघाडी अलकाताई आत्राम, नगराध्यक्ष सुलभाताई पिपरे, भाजपाचे महामंत्री ईश्वर नेताम, माजी उपसभापती विनोद भाऊ देशमुख, सेवा पंधरवडा तालुकाप्रमुख मोहन चलाख, चिंतलधाबाचे उपसरपंच रोशन ठेंगणे, नगरसेवक दर्शन गोरंटीवार, गुरुदास पिपरे महामंत्री, रमेश बोभाटे, पशुवै...

जांबियागट्टा येथील ग्रामस्थांसोबत माजी आमदार दिपक दादा आत्राम यांनी साधला जनसंवाद

इमेज
          माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या जनसंवादाला ग्रामस्थांची लक्षणीय उपस्तीती होती रवि बारसागांडी गडचिरोली जिल्हा प्रतिनिधि     एटापल्ली..तालुक्यातील अतिदुर्गम ,नक्षलग्रस्त व मागासलेल्या जांबियागट्टा येथील ग्रामस्थांसोबत आविसंचे विभागीय अध्यक्ष व माजी आमदार दिपक दादा आत्राम यांनी जनसंवाद साधत परिसरातील समस्या जाणून घेतल्या.यावेळी जांबियागट्टा व परिसरातील येथील ग्रामस्थांनी माजी आमदार दिपक आत्राम यांचेसमोर आरोग्य,सिंचन,रस्ते,वनहक्के दावे,शिक्षण,रोजगार असे अनेक ज्वलंत समस्या मांडल्या. जांबियागट्टा व परिसरातील ग्रामस्थांनी मांडलेल्या प्रत्येक समस्यावर तोडगा काढू,आणि जांबियागट्टा सह परिसरातील गावांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे उपस्तितांना यावेळी त्यांनी ग्वाही दिली. .               माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या जनसंवाद सभेला जांबियागट्टा व परिसरातील गावातील ग्रामस्थांची उपस्थिती लक्षणीय होती.           जांबियागट्टा येथे पार पडलेल्या माजी आमदार आत्राम यांचे जनसंवाद सभेला माजी जि.प.सदस्य संजुभाऊ चरडुके, माजी पं. स.सदस्य रमेश तोरे, अजय मडावी,आविस तालुका उपाध्यक...

पुसकपली जवळील पुलावरून नागरिकांचा जिवघेणा प्रवास

इमेज
    सिरोंचा:- मुसळधार पावसामुळे पुसुकपली येतिल जिलेडा नाल्याचे पाणी भरून वाहल्याने पुलवरच्या डांबरीकरण सहित रस्ता उकढुन गेला . शासन लक्ष देऊन त्वरित दुरुस्त करावी जेणेकरून लोकांचे जीव वाचेल अशी नागरिकांची मागणी होत आहे . मुरुम पूर्णता वाहून गेल्याने पुसुकपली , नेमडा , टेकडा ताला , जाफ्राबाद , मोकेला  असे पाच गावचे लोक याच रस्त्याने प्रवास करतात . यापूर्वी झालेले अतिवृष्टीमुळे निर्माण झालेला पुरामुळे पंधरा हा रस्ता बंद होता आणि आता प्रामुख्याने हा रस्ता कंबालपेटा ते टेकडा ५ कि मी अंतर च्या हा रस्ताकडे कोणीच लक्ष देत नसून ५ किमी अंतर रास्ता जाण्यासाठी कमीत कमी अर्धा एक तास लागत आहे . पूर्णता खड्डे खड्डे पडले आहे .  या रस्ताकडे  प्रशासन व लोक प्रतिनिधी पुसुकपली जवळील जिलेडा नालावरील पुलाकडे लक्ष देऊन लवकरात लवकर या जिलेडा नाल्यावर नविन पुलाची निर्माण करावी तसेच टेकडा ते कंबालपेटा हा मार्ग सिरोंचा ते अहेरी 353 C क्रमाकाचा राष्टीय महामार्गला जोडनारा मार्ग असुन ह्या मार्ग अति लोडिंगच्या वाहतुकीने रस्त्यामध्ये अनेक ठिकानी मोठे मोठे खड्डे निर्माण झाला आहे टेकडा येतुन सिरोंचा प्रवास करण्यासाठी ...

कै. नीलकंठराव शिंदे प्रशासकीय सेवा महाविद्यालयात रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन शिबिराचे आयोजन

इमेज
  वरोरा :- भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती द्वारा संचालित कै. निळकंठराव शिंदे प्रशासकीय सेवा महाविद्यालय वरोरा येथे रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून श्री. रमेशराव राजूरकर उद्योगपती व समाजसेवक वरोरा हे उपस्थितीत होते. भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती द्वारा संचालित कै. निळकंठराव शिंदे प्रशासकीय सेवा महाविद्यालय वरोरा येथे रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून उद्योगपती व समाजसेवक रमेश राजूरकर वरोरा हे उपस्थित होते. रोजगार व स्वयंरोजगार कार्यरक्रमात मार्गदर्शन करतांना विद्यार्थ्यांनी सरकारी सेवेच्या मागे न लागता आपण उद्योगपती होऊन इतरांना नोकरी देणारे व्हावे असे मार्गदर्शन केले. प्राचार्य पियुष लांडगे यांच्या हस्ते पाहूण्यांचा सत्कार करण्यात आला. पाहूण्यांचा परिचय व प्रास्ताविक डॉ. प्रशांत पाठक यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मानसी खोंडे हिने केले. व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन तृप्ती वाढई हिने केले. हा कार्यक्रम महाविद्यालयाचे संचालक डॉ. कार्तिक श...

जाहिरात ही पत्रकाराचा आधार आहे/संपादक विजयकुमार मोरे पाटील

इमेज
प्रतिनिधी महाराष्ट्र:- ग्रामीण भागात पञकारीता करणे खुप जिकरीचे झाले.असुन आज हि अनेक जणांना असा गैरसमज आहे कि पञकारांना खुप काही मिळते असं वाढते पण  मिञनो आम्ही तुमच्या बातम्या कव्हर करण्यासाठी अनेकवेळा घरची असो कि इतर म्हत्वाची कामे असो ती बाजुला ठेवुन दिवसभर तुमच्या बातमीचे वार्तांकन करतो.असा प्रसंग एक वेळ नाही तर वर्षातुन अनेक वेळा येतो.शिवाय शेतकरी,व्यापारी,मजुर,सर्वसामान्य नागरिक यांच्या अनेक समस्यांना निर्भिड पणे आपापल्या दैनिकात किवा सोशल मीडिया पोर्टल ब्लॉग मध्ये प्रसिध्दी देवुन वाचा फोडतो.जो पर्यंत वाचा फुटत नाही तो पर्यंत बातमी लावुन धरतो.हे सर्व करीत असतांना शेवटी दैनिक चालवण्यासाठी हि पैसा लागतो आणि पोर्टल.ब्लाग ला पण पैसा लागतो.त्यामुळे दैनिकाची वेळोवेळी आपल्या प्रतिनिधी मार्फत आपल्या राजकीय सामाजिक किंवा इतर काही तरी जाहिराती मिळाव्या म्हणून नेहमी तगादा असतो.या जाहिराती साठी आम्ही जर वर्षातुन एखाद दोन वेळेस दिवाळी,ईद,जयंती,सण किंवा वाढदिवसाच्या जाहिरातीची मागणी केली तर अनेक जण अगोदर फोन घेतात मात्र जाहिराती विषय बोललो कि फोन देखील उचलत नाही.तुम्हीच सांगा बातम्यांसाठी आ...

मजीतपूर आश्रम शाळेचे मुध्ख्यध्यापक व शिक्षक निलंबित

इमेज
स्थानिक आमदार विजय रहांगडाले यांनी मिळवून दिला आदिवासी विद्यार्थ्याना न्याय तिरोडा:- महाराष्ट्र राज्यात डोंगराळ व दुर्गम भागात राहणा-या अनुसूचित जमातीचे सामाजीक व शैक्षणिक प्रगती होण्यासाठी सन 1972-73 पासून क्षेत्रविकासाचा दृष्टीकोन स्विकारण्यात आला अशा भागाचा मूलभूत विकास व्हावा आणि त्याचा फायदा सर्वांना व्हावा यासाठी तेथे मूळ केंद्रस्थान म्हणून आश्रमशाळा आसावी या शाळेत आदिवासी विद्यार्थ्यांची इ. १२ वी पर्यंतच्या शिक्षणाची महाराष्ट्र शासनातर्फे करण्यात आलेली आहे गोंदिया जिल्ह्यातील मजीतपुर येथेआदिवासी विभागाची माध्य.व उच्च माध्यमिक निवासी आश्रम शाळा नियमितरित्या सुरु असून सत्र २०२२-२३ मध्ये विद्यार्थ्यांच्या क्रीडा गुणांना वाव मिळावा याकरिता दिनांक २२ सप्टेंबर ते २४ सप्टेंबरपर्यंत आदिवाशी आश्रम शाळा येथे क्रिडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते व या क्रिडा स्पर्धेकरिता मजीतपूर येथील एकूण उच्च माध्यमिक गटातील १२० विद्यार्थी सहभागी झाले असून या स्पर्धेमध्ये सहभागी विद्यार्थ्यांची संपूर्ण जवाबदारी हि मुख्याध्यापक व संबधीत क्रिडा शिक्षकाची होती परंतु मजीतपूर येथील मुख्याध्यापक एस.के.थूलकर ...

ट्रॅक्टर पलटी खाऊन एका महिलेचा जागीच मृत्यू

इमेज
चिमूर तालुका प्रतिनिधी:- दरारा:-चिमूर जवळील नेरी पासून १५ किमी अंतरावरील काजळसर येथे गणपती विसर्जन करून ट्रॅक्टरने जात असतांना ट्रॅक्टर भर वेगात पलटल्याने १ महिला जागेवर ठार तर २५ ते ३० विद्यार्थी गंभीर जखमी त्यात १५ ते २० महिला सुद्धा गंभीर जखमी झाल्या आहेत. यांच्यावर उप जिल्हा रुग्णालय चिमुर येथे प्रथमोपचार सुरु असून काहींना तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले आहे. याबाबत घटनेची माहीती मिळताच चिमुर शहरातील खासगी डॉक्टर सुद्धा तात्काळ मदतीसाठी उपजिल्हा ररूग्णालयात दाखल झाले. चिमुर पोलीस पुढील तपास करीत आहे.

चंद्रपूर महाकाली महोत्सव- सराफा असोशिएशन देणार चांदीची आठ किलो वजनाची महाकाली मातेची मुर्ती !

इमेज
महोत्सव निमित्ताने दुसरी नियोजन बैठक संपन्न ! चंद्रपूर-किरण घाटे        नवरात्रोत्सवात माता महाकाली महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यात चंद्रपूरातील दान दात्यांनी समोर येण्याचे आवाहन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सराफा असोशिएशनने महोत्सवाकरिता आठ किलो वजनाची माता महाकालीची मुर्ती देण्याची घोषणा काल केली.       माता महाकाली उत्सवाच्या नियोजनाच्या दुस-या बैठकीचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले होते. सदरहु बैठकीत सराफा असोशिएशने उपरोक्त घोषणा केली आहे. या बाबत आमदार किशोर जोरगेवार यांनी माता महाकाली भक्तांच्या वतीने सराफा असोशिएशनचे आभार मानले आहे. दरम्यान सराफा असोशिएशनचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र लोढा, जिल्हा उपाध्यक्ष ओमप्रकाश सोनी, जिल्हा सचिव आशु सांगोळे, जिल्हा संपर्क सचिव भिमराज कुकरा, जिल्हा कोषाध्यक्ष मितेश लोढिया, शहर असोशिएशन अध्यक्ष भारत शिंदे, कोषाध्यक्ष प्रवीण जुमडे, सहसचिव राकेश ठकरे, सल्लागार समिती सदस्य राजेंद्र लोढा, सत्यम सोनी, कार्यकारी सदस्य प्रमोद लुनावत, संजय सराफ, मितेश लोढिया, भिवराज सोनी, विजय चांड...

बालविवाह प्रतिबंध मार्गदर्शनपर पालक मेळावा आयोजित करण्यात आला

इमेज
भोकर तालुक्यातील चिदगिरी येथील जि प शाळेमध्ये बालविवाह प्रतिबंध मार्गदर्शनपर पालक मेळावा आयोजित करण्यात आला जी नांदेड येथील युनिसेफच्या वतीने एनजीओ मार्फत बालविवाह प्रतिबंध कायदे विषयी सखोल मार्गदर्शन एनजीओ या संघटनेच्या सो अशा वळवी मॅडम सो सविता गायकवाड मॅडम व श्री कृतीलाल वळवी सर यांनी उपस्थित राहून बहुसंख्य नागरिकांना दोन सत्रात मार्गदर्शन केले एक सत्र महिला व पुरुष नागरिकांना व दुसऱ्या सत्रामध्ये पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले विविध साहित्याच्या माध्यमातून गीतातून उत्स्फूर्तपणे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि प शाळेचे मुख्याध्यापक अवधाने सर प्रमुख पाहुणे म्हणून अवधूत गिरी पत्रकार प्रतिनिधी गोविंद गिरी उपसरपंच प्रतिनिधी सुधाकर कंदेवाड दत्ता जाधव संतोष चव्हाण संजय कदम गावातील असंख्य नागरिक बचत गटातील महिला अंगणवाडी सेविका गावातील सामाजिक कार्यकर्ते विविध पक्ष संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

ट्रक आणि आयचेरच्या धडकेत 5 ठार तर 5 जखमी...

इमेज
थोडक्यात माहिती अशी की नांदेड किनवट राष्ट्रीय महामार्ग  सोनारी फाटा आणि करंजी जवळ ट्रक आणि आयचरची जोरदार धडक होऊन पाच  ठारतर पाच गंभीर जखमी असुन त्यांना जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्र मध्ये दाखल करण्यात आले असून पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.सुत्राकडून प्राप्त माहिती अशी की ही घटना सायंकाळी 7 वाजुन 45 मिनिटाला घडली या मध्ये मृत्यूमध्ये बिहारी कामगार असल्याची सांगितले जात आहे मृतामध्ये संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे

माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ हे अभियान प्रभावीपणे राबवा - जिल्हाधिकारी गुल्हाने

इमेज
‘ जिल्ह्यातील महिलांची नवरात्रोत्सवात होणार आरोग्य तपासणी राज्यभरात 26 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर दरम्यान ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत 18 वर्षांवरील महिला, माता, गरोदर महिलांची आरोग्य तपासणी करण्यात येणार असून यशस्वीतेसाठी हे अभियान जिल्ह्यात प्रभावीपणे राबवा, अशा सुचना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आरोग्य यंत्रणेला दिल्या.जिल्हाधिकारी कार्यालयातील विस कलमी सभागृहात आयोजित जिल्हा आरोग्य समिती नियोजन मंडळाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने म्हणाले, नवरात्र उत्सवात राबवल्या जाणाऱ्या अभियानात  एक महिन्याच्या कालावधीत 18 वर्षावरील सर्व महिला, माता व गरोदर स्त्रियांची आरोग्य तपासणी करावी. या अभियानांतर्गत मातांना तज्ञांमार्फत तपासणी, समुपदेशन व औषधोपचार द्यावा. जिल्ह्यातील जास्तीत जास्त माता व इतर 18 वर्षावरील महिलांच्या तपासणीचे आयोजन करावे. त्यामध्ये प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक सुविधा उपलब्ध करून सुरक्षित व सुदृढ आरोग्यासाठी समुपदेशन करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.27 सप्टेंबर रोजी ग्रामीण रुग्णालय, बल्...

शासकीय आश्रम शाळा जिवती येथे इंग्लिश स्पिकिंग क्लब उपक्रम नियोजन

इमेज
जिवती:   शासकीय आश्रम शाळा येथे इंग्लिश स्पिकिंग क्लब उपक्रमाची सुरूवात,भविष्य वेधी शिक्षण प्रणाली नुसार शासकीय शाळेत विविध उपक्रम सुरू असून जिवती आश्रम शाळेत उमेश राठोड मुख्याध्यापक यांनी मुलांना इंग्रजी बोलता यावे,करिता हा उपक्रम सुरू केला.असून दर शनिवारी शाळेचे मुलं या उपक्रमात भाग घेतात, ह्या शनिवारला कुकिंग रेसिपी इन इंग्लिश हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला .विद्यार्थ्यांनी मेकिंग टी, आलू पराठा आम्लेट , इ,रेसिपी तयार करून इंग्रजीतून वर्णन करुन दाखविले ,त्यांना मार्गदर्शक म्हणून पारधी,पवार ,राठोड ,खडतकर, चुणारकर, खाडे, खैरे,बिरादार ह्या शिक्षकांनी मार्गदर्शन केले.मुख्याध्यापक उमेश राठोड यांनी मुलांना बक्षिसे दिली. मा.सहाय्यक जिल्हाधिकारी रोहन घुगे चंद्रपूर यांनी सदर उपक्रमाचे कौतुक केले आहे.

भोकर तालुक्यात अतिवृष्टी ग्रस्त बाधित शेतकऱ्यांसाठी प्राप्त झाले 52 कोटी 43 लाख रुपयाचे अनुदान

इमेज
  भोकर (तालुका प्रतिनिधी) चालू वर्षाच्या खरीप हंगामात पावसाने प्रचंड प्रमाणात पिकांचे नुकसान झाले, पूर्ण शेती जलमय झाली, अतिवृष्टीने बाधित 45 हजार 460 शेतकऱ्यांना 38 हजार 552 हेक्टर शेतातील नुकसानीसाठी 52 कोटी 43 लाख रुपये शासनाचे अनुदान प्राप्त झाल्याची माहिती तहसीलदार राजेश लांडगे यांनी दिली.        भोकर तालुक्यात जुलै व ऑगस्ट महिन्यामध्ये संततधार पाऊस झाल्याने नदी नाल्यांना पूर आले शेती व शेतातील पिकेही वाहून गेले, शेती जलमय झाल्यामुळे त्यामधील कापूस, सोयाबीन, ज्वारी, उडीद, मूग हाती लागले नाही, शेतकऱ्यांना मोठे आर्थिक संकट ओढवले, शेतातील पीक जमिनीच्या वर येत असतानाच पावसाने कहर केला ऑगस्ट महिन्यामध्येच पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली. आधीच शेतकऱ्यांना अनुदान जाहीर करावे नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्याकडून कडून करण्यात आल्याने शासनाने बाधित झालेल्या शेतीचे पंचनामे करून अहवाल पाठवण्याचे आदेश दिले होते त्यानुसार महसूल विभागाने तालुक्यातील बाधित शेतीचा अहवाल पाठविला होता. *भोकर तालुक्यासाठी 52 कोटी 43लाख रु.अनुदान प्राप्त ****************************** ****...