भारतीय लोकशाही धोक्यात ! सर्वांनी अलर्ट होणे गरजेचे - प्रा. श्याम मानव

भारतीय लोकशाही धोक्यात ! सर्वांनी अलर्ट होणे गरजेचे - प्रा. श्याम मानव पोंभुर्णा :- मागील कित्येक दशकांपासून पत्रकारिता क्षेत्रात काम करताना व त्यानंतर अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती चळवळीत प्रबोधनाचे धडे गिरवीत लोकांना जागृत करत देशभर फिरत देशाच्या कानाकोपऱ्यातील अवस्था बघितली आहे. या देशाची वाटचाल अधोध गतीकडे चाललेली असून लोकशाही जिवंत राहिली आहे की नाही असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. लोकशाही आणि घटनेला शाबूत ठेवण्याची तुमची आमची सर्वांची जबाबदारी आहे. अन्यथा पुन्हा मनुस्मृतीचा जन्म होईल असे परखड मत प्राध्यापक शाम मानव सर यांनी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केले. एक मार्च रोजी शहरात जाहीर व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे त्या कार्यक्रमाच्या संदर्भात प्राध्यापक मानव सरांनी पत्रकारांना संबोधित केले. राज्य व देशपातळीवर गेली ३५ वर्षापासून विविध विषयासंदर्भात वृत्त वाहिनीच्या माध्यमातून निर्भीडपणे मांडणी करणारे ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे, यांच्यावर पुण्यात जीवघेणा हल्ला झाला. या घटनामुळे लोकशाही कुठे शिल्लक राहिली असा प्रश्न आजच्या घडीला उद्भवतो आहे....