भारतीय लोकशाही धोक्यात ! सर्वांनी अलर्ट होणे गरजेचे - प्रा. श्याम मानव
पोंभुर्णा :- मागील कित्येक दशकांपासून पत्रकारिता क्षेत्रात काम करताना व त्यानंतर अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती चळवळीत प्रबोधनाचे धडे गिरवीत लोकांना जागृत करत देशभर फिरत देशाच्या कानाकोपऱ्यातील अवस्था बघितली आहे. या देशाची वाटचाल अधोध गतीकडे चाललेली असून लोकशाही जिवंत राहिली आहे की नाही असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. लोकशाही आणि घटनेला शाबूत ठेवण्याची तुमची आमची सर्वांची जबाबदारी आहे. अन्यथा पुन्हा मनुस्मृतीचा जन्म होईल असे परखड मत प्राध्यापक शाम मानव सर यांनी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केले.
एक मार्च रोजी शहरात जाहीर व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे त्या कार्यक्रमाच्या संदर्भात प्राध्यापक मानव सरांनी पत्रकारांना संबोधित केले.
राज्य व देशपातळीवर गेली ३५ वर्षापासून विविध विषयासंदर्भात वृत्त वाहिनीच्या माध्यमातून निर्भीडपणे मांडणी करणारे ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे, यांच्यावर पुण्यात जीवघेणा हल्ला झाला. या घटनामुळे लोकशाही कुठे शिल्लक राहिली असा प्रश्न आजच्या घडीला उद्भवतो आहे. गेल्या सात-आठ वर्षापासून लोकशाहीला प्रचंड धोका निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
याप्रसंगी, सुरेश झुरमुरे राष्ट्रीय कार्याध्यक्ष अ.भा.अंधश्रद्धा निर्मूलन समिती तथा(PIMC) सदस्य महाराष्ट्र सरकार, उपस्थित होते.
या प्रसंगी प्रा.मानव सर म्हणाले की,गेल्या कित्येक वर्षांपासून अंधश्रद्धा निर्मूलन मध्ये काम करताना अनेक अडचणीना व आव्हानांना तोंड देत समोर जावं लागलं, त्यानंतर जादूटोणा विरोधी कायदेविषयक विधेयक पारित होऊन कायद्यात रूपांतर झाले .
याप्रसंगी स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र कालावधीनंतरचा विचार विमर्श राष्ट्रपिता महात्मा गांधी, भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, त्यानंतर लोकमान्य टिळकांची वैचारिक ओळख, आणि नथुराम गोडसे यांचा हिंसात्मक विचारही या प्रसंगी मांडला .
इंदिरा गांधींची आणीबाणी व जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनाचा काळ व त्यानंतर वेगवेगळ्या आंदोलनात अनेक मित्र समवेत दहा महिने भोगेला तुरुंगवास याची आठवण करून देत देताना मुद्देसूद विश्लेषण केले.
देशाचे लोकप्रिय पंतप्रधान यांनी लोकहित व धोरणात्मक कसे एकसूत्री अट्टहासी कार्यक्रम राबविले व सध्या अनेक विविध राबविले जात आहेत. त्याचा पाडाच पत्रकार परिषदेत वाचला व सविस्तरपणे विश्लेषणात्मक बाजू मांडली .
पंतप्रधानांनी घेतलेले तीन निर्णय किती भयानक आहेत डिझेलच्या पेट्रोल महागाई, नोटबंदी यावरही प्रकाश टाकला. संपूर्ण भारतात कोविड परिस्थितीत जनतेचे विदारक चित्र संपूर्ण भारताने भारतातील नागरिकांनी स्वतः अनुभवले किंबहुना महाराष्ट्रात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राची बाजू कोविड परिस्थितीत योग्यपणे सांभाळली हे महत्त्वाचे होते.
सर्व सामान्य नागरिकांच्या मनात लोकशाहीमध्ये खरी लोकशाहीची मुल्ये जोपासत ठेवायची असल्यास आता बदल घडवल्याशिवाय पर्याय नाही . प्रा. श्याम मानव यांनी केला. भारतीय लोकशाही धोक्यात आली असून लोक उघडपणे बोलायला घाबरत आहेत. जे बोलत आहेत त्यांच्यावर वेगवेगळ्या चौकशा लावून, हल्ले करून लोकशाहीचा गळा घोटण्याचे कार्य सुरू आहे.देश हिटलरशाहि विचार प्रक्रियेकडे कडे वेगाने जात आहे २०२४ मध्ये नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास ही लोकशाहीची शेवटची निवडणूक असेल, यानंतर या देशात पुन्हा निवडणूक होईल की नाही, असे खुले मत प्रा.श्याम मानव यांनी व्यक्त केले. “भारतीय लोकशाही पुढील आव्हाने” या व्याख्यान कार्यक्रमाच्या निमित्ताने व्हीआयपी विश्रामगृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
0 Comments