Ticker

6/recent/ticker-posts

प्रा. श्याम मानव यांचे आज पोंभुर्णात जाहीर व्याख्यान


प्रा. श्याम मानव यांचे आज पोंभुर्णात जाहीर व्याख्यान

पोंभुर्णा - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राष्ट्रीय संघटक आणि सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा. श्याम मानव यांचे आज 1 मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता पोंभुर्णा शहरातील बुक्कावार राइस मिल येथील भव्य पटांगणात जाहीर व्याख्यान होणार आहे.

विविध सामाजिक संघटना कृती समितीच्या वतीने या जाहीर व्याख्यानाचे आयोजन केले असून 'भारतीय संविधान,लोकशाही समोरील आव्हाने' हा प्रा. श्याम मानव यांच्या व्याख्यानाचा विषय आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अंनिस चे जिल्हाध्यक्ष गोविंदराव भेंडारकर हे उपस्थित राहणार आहेत.

 प्रा. श्याम मानव हे सध्या संपूर्ण महाराष्ट्रात 'भारतीय लोकशाही समोरील आव्हाने' हा विषय घेऊन जनजागृती करत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर पोंभुर्णात सुद्धा त्यांच्या जाहीर व्याख्यानाचे आयोजन आज केले आहे.

तरी तालुक्यातील सर्व नागरिकांनी या व्याख्यानाचा लाभ घेण्यासाठी मोठ्यासंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन विविध सामाजिक संघटना कृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे.










Post a Comment

0 Comments