गदगांव बौध्द समाजास आबादीची जागा देण्यात यावी. - रि. पा. इं मागणी

*गदगांव बौध्द समाजास आबादीची जागा देण्यात यावी. - रि. पा. इं मागणी* चिमूर :- मौजा गदगाव येथील प्लॉट नं. 28 आराजी 0.8 हे. आर. ही आबादीची जागा बौध्द समाजास कायमस्वरूपी देऊन गावात सामाजिक सौख्य निर्माण करावे अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या शिष्टमंडळाने मा. उपविभागीय अधिकारी आणि मा. तहसीलदार चिमूर यांना दिलेल्या निवेदनात केलेली आहे. शिष्टमंडळात रिपाई नागपूर प्रदेश सरचिटणीस सिद्धार्थ सुमन, उपाध्यक्ष नेताजी वि. तु. बुरचुंडे, चंद्रपूर ज़िल्हाध्यक्ष गोपाल रायपूरे, गडचिरोली ज़िल्हा रिपाई नेते मुनेश्वर बोरकर, चिमूर ता. अध्यक्ष अँड. जयदेव मुन, अँड. सोंडवले किशोर अंबादे, भद्रावती ता. अध्यक्ष संतोषभाई रामटेके, महिला आघाडी ता. अध्यक्षा नंदा रामटेके, शेवंताबाई मेश्राम, दीपा चांदेकर, वरोरा ता अध्यक्ष अनिल वानखेडे , उपाध्यक्ष पुरषोत्तम वैद्य, महिला आघाडी अध्यक्षा छाया लाभाने नेरी शहर अध्यक्ष मिलिंद जांभुळकर, गदगाव येथील रणजित शंभरकर, चंदा गेडाम, अमोल शंभरकर, विना काळे, तेजस शंभरकर, आणि बौध्द समाज बांधव उपस्थित होते. याबाबत सविस्तर असे की, गदगाव येथी...