Booking.com ही मूळ डच कंपनी आहे. जगभरात ही ऑनलाईन ट्रॅव्हलर कंपनी म्हणून नावाजलेली आहे. मोठमोठ्या शहरात तात्पुरत्या निवासासाठी ही कंपनी हॉटेल्स पुरवते. हे काम कंपनी १९९६ पासून करत आलेली आहे. मात्र दिवसेंदिवस या कंपनीच्या सर्व्हिसविषयी मोठ्या प्रमाणावर तक्रारी येत आहेत.
मुंबईच्या वरळी भागातील मुकुंद कुलकर्णी हे सामाजिक व भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत. त्यांना १० ते १५ जून या कालावधीत लंडन येथे जायचे होते. त्यासाठी त्यांनी लंडन येथील City Aldgate या हॉटेलमध्ये राहण्यासाठी बुकिंग.कॉम या कंपनीच्या वेबसाईटवर बुकिंग केले होते. तेही १ महिना अगोदर. कंपनीला तात्काळ पैसे मिळाले, तशी पावतीही आली.
कुलकर्णी त्यांच्या पत्नी व दोन मुलांसह लंडन येथे रवानाही झाले. मात्र ऐनवेळी हॉटेल व्यवस्थापनाने त्यांना परवानगी नाकारली. '२५ वर्षांखालील व्यक्तींना आम्ही प्रवेश देत नाही,' हे तकलादू कारण दाखवून त्यांना हॉटेलमध्ये साधा प्रवेशही दिला नाही.
कुलकर्णी यांचे ६० तर पत्नीचे वय ५५ आहे, म्हणून आम्हाला राहू द्या. मुलांना दुसऱ्या हॉटेलमध्ये ठेवतो असे त्यांनी सांगितले. मात्र हॉटेलच्या व्यवस्थापनाने त्यांना चक्क हाकलून दिले.
ऐनवेळी कुलकर्णी यांनी दुसऱ्या हॉटेलमध्ये दुप्पट रक्कम घेऊन मुक्कामाची सोय करून घेतली. त्यानंतर बुकिंग.कॉम वर तक्रार केली. तरीही त्याचा काहीही उपयोग झाला नाही.
यानंतर भारतात परतल्यावर कुलकर्णी यांनी मुंबईतील वरळी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली. त्याला १ महिना उलटून गेला, मात्र अद्यापही एफआयआर झाला नाही. पोलिसांनी या बुकिंग.कॉम या कंपनीच्या व्यवस्थापनाशी संपर्क साधला होता. मात्र पुढील कारवाईस टाळाटाळ करीत आहेत.
वरळी पोलिसांचे या बुकिंग कंपनीशी 'अर्थ'पूर्ण संबंध आहे, त्यामुळेच पोलीस कोणतीही कार्यवाही करीत नाहीत, इतकेच नव्हे तर ते या कथित फ्रॉड कंपनीचे एजन्ट असल्यासारखे वागतात, त्यामुळेच पोलीस व सायबर सेलमधील अधिकाऱ्यांची भूमिका ही संशयास्पद आहे, अशी माहिती स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीमला मिळालेली आहे.
जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
सहकार्य:उन्मेष गुजराथी
स्प्राऊट्स ब्रँड स्टोरी
0 Comments