Ticker

6/recent/ticker-posts

बेपत्ता असलेल्या इसमाचा आढळला मृतदेह! सातारा कोमटी येथील घटना



तालुका प्रतिनिधी
     सातारा कोमटी नियत क्षेत्रातील जंगलात बुरे चारण्यासाठी दिलेल्या इसमाचा गुरुवारी जंगलातील वन तलावात मृतदेह आढळून आला. रामभाऊ यशवंत मडावी वय 52 वर्ष असे वृत्त इसमाचे नाव आहे.
       रामभाऊ मडावी नेहमीप्रमाणे आपल्या गुरे चारण्याच्या कामास जंगलात गेला होता. मात्र तो संध्याकाळ होऊ नये घरी परत आला नाही. त्यामुळे नातेवाईकांनी व घरच्या मंडळींनी सर्वत्र शोध मोहीम राबवली मात्र त्याचा कुठेही पत्ता लागला नाही. गुरुवारी सकाळी सातारा कोमटी नियत क्षेत्रातील बीड क्रमांक 439 मध्ये असलेल्या वन तलावात बेपत्ता असलेल्या गुराख्याचा मृतदेह आढळून आला.
       पोलिसांनी मर्ग दाखल करून त्याचा मृत्यू नेमका कसा झाला याचा तपास सुरू केला आहे.

Post a Comment

0 Comments