मेरठ:महिला आपले फुकट गेलेले पैसे कसे बसून करायचे अगदी मनातून जाणतात.अश्याच प्रकारची घटना घडली उत्तर प्रदेशच्या मेरठ शहरात. मेरठच्या बेगम पूल जवळील साडीच्या दुकानाबाहेर एका महिलेने मंगळवारी चांगलाच हंगामा केला. करवा चौथसाठी नेलेली साडी एकदा नेसल्यानंतर फाटली. मग महिलेचा पारा चढला. साडीचे पैसे परत घेण्यासाठी महिला तावातावाने संबंधित दुकानात पोहचली. दुकानदाराकडे तिने पैसे परत मागितले मात्र त्याने पैसे देण्यास नकार दिला. यावर महिलेने दुकानाबाहेर येऊन भर रस्त्यावरच साडीला आग लावण्याचा प्रयत्न केला.
याबाबत सविस्तर असे की,रीना शर्मा ही मेरठची रहिवासी असून काही दिवसांपुर्वी तिने "उत्सव रास" या साडीच्या शोरुममधून ५ हजार रुपयांची साडी खरेदी केली होती. केवळ एकदा वापरल्यानंतर साडी फाटली असा आरोप तिने केला. महिला साडी परत करण्यासाठी दुकानात पोहोचली. दुकानदाराने तिचे काहीच ऐकून न घेतल्याने महिलेने भर रस्त्यातच साडीला आग लावली. या सर्व प्रकाराची सूचना मिळताच पोलिसही तिथे दाखल झाले आणि महिलेची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र पैसे परत घेतल्याशिवाय जाणार नाही असाच पवित्रा तिने घेतला. महिलेचा एकंदर असा पवित्रा बघून अखेर दुकानदार पैसे देण्यास तयार झाला. मग काय आपले पैसे वसूल करून महिलेने तेथून काढता पाय घेतला.
0 Comments