विजय जाधव नांदगाव:ग्रामीण भागात क्रिकेटला महत्व प्राप्त व्हावे आणि खेळाडूंना चालना मिळावी असे प्रतिपादन नांदगावच्या सरपंच एडवोकेट कुमारी हिमानीताई वाकुडकर यांनी व्यक्त केले. थ्री स्टार क्रिकेट क्लब नांदगावच्या वतीने आयोजित बक्षीस वितरण कार्यक्रमात त्या बोलत होत्या. नांदगावात क्रिकेट आणि कबड्डी या सामन्यांची स्पर्धा सुरू असून गावात येणाऱ्या सर्व खेळाडूंचे आणि क्रीडा प्रेमींचे यावेळी त्यांनी अभिनंदन केले आहे. सर्वसामान्य सर्व खेळाडू जिंकासाठी येतात परंतु हार जीत प्रत्येकाला असते, कुणीही नाराज न होता हार आणि जीत खेळाडू वृत्तीने स्वीकारावी असे आवाहन हिमानीताई वाकुडकर यांनी बक्षीस वितरण कार्यक्रमाप्रसंगी केले. यावेळी बक्षीस वितरक म्हणून जिल्हा मजदूर सहकारी संघाचे माजी अध्यक्ष नांदगाव चे माजी सरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य यांनी समायोजित मार्गदर्शन केले मूल पंचायत समितीचे माजी उपसभापती माननीय दशरथ भाऊ वाकुडकर यांनी गावात कुठलेही राजकारण न करता गाव विकासासाठी मी सदैव तत्पर असून विरोधकांनी आरोप न करता प्रत्यक्षरीत्या एकत्र बसून बैठक लावून कोणतेही प्रश्न सोडविता येतात. त्यातूनच कोणताही मार्ग निघू शकते अशी विनंती त्यांनी आपल्या भाषणातून केलेली आहे. यावेळी मंचावर विशेष अतिथी म्हणून जुना सूर्लाचे सरपंच समर्थ तसेच नांदगाव सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष माजी सरपंच प्रकाश जी आंबेडकर, नांदगावचे विद्यमान ग्रामपंचायत चे सदस्य त्रिमूर्ती महाजनकर, माजी सदस्य विनोद जी वाकडे, प्रमोद भाऊ चौधरी, इत्यादी मान्यवर बक्षीस वितरण कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित होते. चंद्रपूरची अष्टपैलू मॅच जिंकल्यामुळे त्यांना प्रथम पारितोषिक मंडळाच्या वतीने प्रशांत भाऊ बांबोडे यांचे शुभ असते देण्यात आले. द्वितीय पारितोषिक नांदगाव येथील खेळाडूंना सरपंच महोदयांच्या हस्ते प्रदान करण्यात आले .तसेच बोर चांदली येथील खेळाडूंचे अभिनंदन करण्यात आले. बेस्ट बॉलर ,बेस्ट बॅट्समन, उत्कृष्ट एसटी रक्षक यांना सुद्धा गौरविण्यात आले. त्याचप्रमाणे मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज, देऊन सर्वांना सन्मानित करण्यात आले. यावेळी क्रीडाप्रेमींची प्रचंड गर्दी दिसून येत होती. या कार्यक्रमाचे संचालन मेघराज चौधरी यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रमोद चौधरी यांनी केले. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडल्याबद्दल माननीय दशरथ भाऊ वाकुडकर यांनी क्रीडा प्रेमींचे खेळाडूंचे तसेच ग्रामस्थांचे आभार मानले.
0 Comments