चंद्रपूर ( का . प्रति.)
चंद्रपूर जिल्ह्यात कोळश्याचा खाणी आहेत, वणी एरिया अंतर्गत येणाऱ्या खाणींमध्ये फार मोठ्या प्रमाणात अफरातफरी होत असल्याचे अनेकदा निदर्शनास येत असते. परंतु आत्तातर चक्क कोळसा ट्रान्सपोर्टिंगचा डिओ असतांना सुद्धा ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांकडून जिवे मारण्याच्या धमक्या देवून कोळश्याचे ट्रक अडविले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. यात हिंदुस्थान लालपेठ कॉलरी प्रशासनाची भुमिका ही संशयास्पद आहे. याविषयी चंद्रपूर शहर पोलिस स्टेशन व सब एरिया मॅनेजर हिंदुस्थान लालपेठ कॉलरी येथे रितसर तक्रार करून ही या गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर कोणतीच कारवाई केल्या गेली नसल्याचा प्रकार समोर आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, मनोज धिरीजन गोंड यांचा चंद्रपूर कोळसा यांचा कोळसा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय असुन हिंदुस्थान लालपेठ कॉलरीमधून लॉयड मेटल्स घुग्घूस येथे कोळसा ट्रान्सपोर्टिंगचे मनोज गोंड यांना अधिकृत कंत्राट मिळाले आहे. तसा त्यांना डिओ सुद्धा देण्यात आलेला आहे. परंतु हिंदुस्थान लालपेठ कॉलरीच्या चेकपोस्टवर परमिट पावत्या बनविण्याचे काम गुंड प्रवृत्तीच्या राहुल बोल्लम व १० - १२ लोकांनी या ट्रान्सपोर्ट मालकाच्या ट्रक चालकांना जिवे मारण्याचा धमक्या देत हे ट्रक थांबविले. आम्हाला वेगळी रक्कम (हप्ता) द्यावी, अशी धमकी देवून लालपेठ कॉलरी परिसरातुन रितसर डिओ असतांना सुद्धा कोळसा भरलेले ट्रक थांबविण्यात आले आहे. मागील काही दिवसांपासून हे ट्रक हिंदुस्थान लालपेठ कॉलरीच्या गेट वर उभे आहे, यासंदर्भात लालपेठ कॉलरी सब एरिया मॅनेजर यांना तक्रार करून सुद्धा त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. ज्या ठिकाणी अधिकृत कंत्राटदाराचे ट्रक थांबविण्यात आले आहे, तो परिसर लालपेठ कॉलरीच्या ताब्यात येतो. कॉलरी परिसरातून निघालेले ट्रक त्यांच्याच परिसरात थांबविले गेले आहेत मग लालपेठ कॉलरी प्रशासन या गुंडाची दादागिरी खपवुन कशी घेत आहे ? लालपेठ सब - एरिया मॅनेजर कडे तक्रार करून ही कोणतीच कारवाई लालपेठ वेकोली प्रशासनाकडून करण्यात आली नाही. लालपेठ प्रशासनाच्या या गैरप्रकाराला मुक संमती तर नाही नां? असा प्रश्न उपस्थित होतो. आमचे स्वतःचे ट्रान्सपोर्ट असोशिएशन आहे, असे म्हणणाऱ्या या गुंड प्रवृत्तीच्या एकाकडे ही स्वतःचे ट्रक नाहीत. याच परिसरात १५० मिटर अंतरावर स्वतःचे युनियन आहे असे म्हणणाऱ्यांचे कार्यालय आहे, व हा परिसर लालपेठ कॉलरीचा अखत्यारीत येतो. त्या ठिकाणी कोळश्याने भरलेले ट्रक थांबविण्यात आलेले आहे. महत्वाचे म्हणजे वेकोली प्रशासनाजवळ सीआरपीएफ चे जवान सुरक्षारक्षक म्हणुन कार्यरत असतांना ही या लालपेठ वेकोली परिसरात ट्रक थांबविण्यात आले आहे, लालपेठ कॉलरी प्रशासन मुंग गिळून गप्प का आहे? हा प्रश्न उद्भवतो. गुंड प्रवृत्तीच्या बळावर हप्ता वसुली करण्याचे गैरप्रकार करणाऱ्यांवर पोलिस व वेकोली प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी अशी मागणी पोलिस व वेकोली प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
सगळ्यात महत्वाचे म्हणजे लॉयड मेटल्स कंपनी घुग्घूस येथे कोळसा पुरवठा करणाऱ्या ट्रकांना थांबविण्यात आल्यामुळे लॉयड मेटल्स कंपनीचे काम थांबू शकते व कंत्राटदाराचे कंत्राट रद्द होवू शकते, त्यामुळे ही दादागिरी थांबविण्यात यावी अशी मागणी ट्रान्सपोर्ट मालकांनी पोलिस प्रशासन व वेकोली प्रशासनाला केली आहे.
0 Comments