मुल: तालुका प्रतिनिधी
नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या पराभवासाठी आणि भाजपच्या विजयासाठी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष गुरु गुरनुले हे जबाबदार आणि कारणीभूत असून त्यांनी तात्काळ राजीनामा देऊन पदमुक्त व्हावे अशी मागणी बोंडाळा खुर्द येथील काँग्रेसच्या पराभूत उमेदवार शालू विजय फाले यांनी केली आहे.
मुल तालुक्यात ग्रामपंचायत निवडणूक 2022 मध्ये काँग्रेस पक्षाने ७ ग्रामपंचायत आपली सत्ता स्थापन केली. उसराळा, आकापूर, बेंबाळ, गडीसुरला, चेक दुगाळा, बाबराळा, बोंडाळा खुर्द ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेस तालुका अध्यक्ष गुरु भाऊ यांनी या गावांना भेट दिली नाही. उलट
खासदार बाळूभाऊ धानोरकर यांनी मात्र विशेष लक्ष देऊन तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत प्रत्येक गावाला भेटी देऊन कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवून दिला. मात्र तालुका अध्यक्ष हे भाजपशी हात मिळवणी केल्यासारखे वागत राहिले. आणि त्यामुळेच काही ग्रामपंचायतीत काँग्रेसला पराभवाला सामोरे जावे लागले. याला एकमेव जबाबदार काँग्रेस तालुका अध्यक्ष गुरु गुरनुले आहेत, असा आरोप पराभूत उमेदवार शालू विजय फाले यांनी केला आहे.
तसेच चेक दुगाळा, बाबराळा, बेंबाळ, आकापुर या चारही गावात काँग्रेसने एक हात्ती सत्ता मिळवली. याचे श्रेय तेथील काँग्रेसच्या ज्येष्ठ, श्रेष्ठ कार्यकर्त्यांना असून तत्पूर्वी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर वनी आरनी क्षेत्राचे लोकप्रिय खासदार माननीय बाळूभाऊ धानोरकर यांनी दौरा करून कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण केला.
काँग्रेस नेते जि प चे माजी उपाध्यक्ष विनोद भाऊ अहिरकर हे सुद्धा खासदार बाळूभाऊ उर्फ सुरेश धानोरकर यांचे समवेत सातवही गावात काँग्रेसचे उमेदवार निवडून आणून काँग्रेसची सत्ता काबीज करण्यासाठी धडपडत होते. त्यांच्या धडपडीमुळेच आणि मेहनती मुळेच उपरोक्त गावातील ग्रामपंचायत मध्ये काँग्रेसला यश संपादित करता आले. याकरिता तेथील काँग्रेस कार्यकर्त्यांनी अहोरात्र परिश्रम घेतले परंतु उसराळा, गडीसुरला तसेच बोंडाळा खुर्द या ग्रामपंचायतीत काँग्रेसला पराभव पत्करावा लागला याला कारणीभूत सर्वस्वी तालुक्याचे अध्यक्ष गुरु भाऊ गुरनुले हे असून त्यांनी ग्रामपंचायतच्या निवडणुकीत कोणतेही लक्ष घातले नाही. किमान प्रचार बॅनर अथवा भेटीगाठी सुद्धा घेतलेल्या नाही.
तरीही माननीय विनोद भाऊ अहिरकर यांच्या सहकार्याने ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याची प्रतिक्रिया बोंडाळा खुर्दच्या पराभूत उमेदवार शालू ताई विजय भाले यांनी व्यक्त केली.
नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये तालुका अध्यक्षांचे शून्य योगदान असून काँग्रेसच्या पराभवाला तालुका अध्यक्ष गुरु भाऊ गुरनुले हेच जबाबदार असल्याने त्यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा व पदमुक्त व्हावे अन्यथा त्यांच्या विरोधात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे तसेच खासदार बाळूभाऊ धानोरकर यांना लेखी तक्रार करणार असल्याचे मत बोंढाळा खुर्द च्या काँग्रेस समर्पित आघाडीच्या सरपंच पदाच्या पराभूत उमेदवार शालू विजय फाले यांनी व्यक्त केले आहे.
0 Comments