Ticker

6/recent/ticker-posts

संताप जनक : महिला सरपंचास मारहाण उपसरपंच अशोक मार्गोनवार यांच्यावर गुन्हा दाखल

 
मुल:महिला सक्षमीकरणाच्या बाता केल्या जात असल्या तरी महिला आजही सुरक्षित नसल्याच्या अनेक घटना घडत मोठ्या पदावर असलेल्या महिला सुद्धा सुरक्षित नसल्याचा प्रकार चंद्रपूर जिल्ह्यातील मुल तालुका अंतर्गत येत असलेल्या चांदापूर येथे घडला. येथील सरपंचा सोनूताई कालिदास देशमुख यांना उपसरपंच मार्गोनवार यांनी मारहाण केली.या प्रकरणी चांदापूर ग्रामपंचायतचे उपसरपंच अशोक मार्कंडी मार्गोनवार यांचे वर मूल पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

चांदापूरच्या सरपंच सोनूताई देशमुख यांच्या तक्रारीवरून मूल पोलिसांनी अशोक मार्गोनवार यांचे विरोधात गुन्हे दाखल केले आहे.
श्रीमती देशमुख यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दिनांक २३ डिसेंबर रोजी ११ वाजता ग्रामपंचायत ची मासिक सभा होती. मासीक सभेला 7 सदस्य उपस्थित होते. विषय क्रमांक 8 नुसार विद्युत साहित्य दर पत्र चालु असतांना उपसरपंच मार्गोनवार विनाकारण दुसरेच मुद्दे सभेतच मांडुन भांडु लागला. मी मासीक सभेची अध्यक्ष पदी असतांना गैरअर्जदार याने सभेतच माझे हात पकडुन उजव्या हाताची बाजू पकडून , गालावर थापड मारली व मारहान केली. त्यामुळे बांगडीचे काचगडुन माझ्या हाताला दुखापत झाली. सदर गैरअर्जदार अशोक मार्गनवार उपसरपंच हा येवढ्यावरच थांबला नाही, तर मला शिव्या देवुन मला जिवे मारण्याची धमकी दिली. व पोलीस स्टेशन मध्ये गेलीस तरी काहीही करू शकत नाही असे म्हणालाा. अश्लील शब्दात शिवीगाळ केली. तु समजतेस काय तेे मी पाहुन घेईन. अशी धमकी दिली.

या तक्रारीवरून मूल पोलिसांनी अपराध क्रमांक 613 अन्वये भादविचे कलम ३५४, ३५४ A(१)(i), ५०९, २९४, ३२३, ५०४, ५०६ नुसार गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे.

Post a Comment

0 Comments