Ticker

6/recent/ticker-posts

पोंभुरणा तालुक्यात रेती तस्करी जोमात! प्रशासन कोमात - माजी शिवसेना तालुकाप्रमुख दत्तू भाऊ मोरे




जिवनदास गेडाम:-पोंभूरणा तालुक्यातील मोहाळा, भीमणी, बलारपूर इत्यादी रेती घाटांवरून सर्रासपणे रेतीचा उपसा व वाहतूक सुरू आहे. दिवस रात्र रेतीचा उपसा करून चोरी करणारे गब्बर झाले आहेत. तालुक्यात सध्या रेतीचे दर गगनाला भिडले असून घरकुल च्या बांधकामा करिता रेतीचा प्रश्न आवासून उभा आहे. सध्या एक ट्रॅक्टर रेतीचे दर ८ हजार रुपये सुरू आहे. राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी रेती तस्करांवर आळा बसवण्यासाठी विधानसभेत घोषणा केली.घाटांचे लिलाव बंद करून साडेसहाशे रुपयात घरपोच वाळू मिळेल असे सरकारने जाहीर केले. मात्र त्यांच्या या निर्णयाचे तालुक्यात पालन आणि अंमलबजावणी होताना दिसत नसून मोठ्या प्रमाणात हायवा ट्रक व इतर साधनांनी रेती चोरी होत असताना प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप शिवसेना माजी तालुकाप्रमुख दत्तू भाऊ मोरे यांनी केला आहे.

घाटांचे लिलाव झाले नसताना सुद्धा मोठ्या प्रमाणात घाटावरून रेतीची वाहतूक सुरू आहे.
तालुक्यात रेतीची तस्करी जाेमात तर महसूल प्रशासन कोमात असल्याने शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे.

रेती तस्करांच्या मुसक्या आवळणार कोण!

पोंभुर्णा तालुक्यात सध्या रेतीची तस्करी जोरात असून यातून अनेक तस्कर गब्बर झाले असून, दुसरीकडे मात्र गरिबांना रेती मिळणे दुरापास्त झाले आहे. त्यामुळे घरकुल बांधकामात अडथळे निर्माण झाले आहे.घरकुल मार्च अखेर पूर्ण झाले नाहीत तर ते वापस होतील असे प्रशासनाकडून घरकुल लाभार्थ्यांना बजावण्यात येत आहे. मात्र रेती नसेल तर घरकुल कसे बांधतील हा प्रश्न अजून प्रशासनाच्या कक्षे बाहेरच असल्याचे दिसते.

रेती घाटावरून रेतीची अवैध वाहतूक करण्यासाठी रेती तस्करांनीच वेळा देखील ठरविल्या आहेत. या सर्व प्रकारामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत असून जिल्हा खनिकर्म विभागाकडून केवळ बघ्याची भूमिका स्वीकारली असल्याने रेती तस्करांच्या मुसक्या आवळणार कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

दखल घेणार कोण?- रेती तस्करीत राजकारणाशी संबंधित काही जण रेती तस्करीत सहभागी असल्याची चर्चा जोरात सुरू आहे. त्यामुळे प्रशासनाकडून कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात आहे. तर या सर्व प्रकाराची दखल घेऊन कारवाई करणार कोण? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

कारवाई करताच वरिष्ठांचे फोन – रेतीची तस्करी करताना वाहने पकडणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांचे वरिष्ठ अधिकारीच तो आपला माणूस आहे, कारवाई करू नका असे सांगून कारवाई न करण्याचा सल्ला देतात. त्यामुळे कनिष्ठ अधिकाऱ्यांना सुद्धा पर्याय नसतो. यापूर्वी असा प्रकार तालुक्यात घडला आहे.

रेती तस्कर म्हणतात सबकुछ मॅनेज है- मागील तीन-चार महिन्यांपासून तालुक्यात रेतीची तस्करी जोरात सुरू आहे. त्यामुळे रेती तस्कर चांगले मालामाल झाले असून, त्यांच्याकडील वाहनांची संख्यादेखील दुप्पट झाली आहे. तर त्यांच्यावर कुठलीच कारवाई होत नसल्याने रेतीची तस्करी सुरळीत आहे. त्यामुळे ते छातीठोकपणे सबकुच्छ मॅनेज असल्याचे सांगत आहेत.
या रेती तस्करीवर ताबडतोब आणा घालून रेती तस्करांच्या मुस्क्या आवळाव्या आणि गोरगरिबांना रेती उपलब्ध करून द्यावी अशी मागणी शिवसेना माजी तालुकाप्रमुख दत्तू भाऊ मोरे यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments