मूल तालुक्यातील नांदगाव येथे विश्वरत्न, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले. दुपारी तीन वाजता गावातील मुख्य चौकांमध्ये महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. तदनंतर सायंकाळी सहा वाजता पासून गावातील मुख्य चौकातून भव्य रॅली काढण्यात आली. भिमरायाच्या या रॅलीन अख्खी नांदगाव नगरी दुमदुमली. फटाक्यांच्या आतिशबाजीत, डीजेच्या तालावर अवघी तरुणाई थिरकली. मध्यवर्ती ठिकाण असलेल्या नांदगाव नगरीत बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी परिसरातील अनुयायी फार मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी झाल्याचे दिसून आले. गावातील गणमान्य व्यक्ती, पदाधिकारी यांचा प्रामुख्याने समावेश होता. महिलांचा सुद्धा उदंड प्रतिसाद लाभला. बाबासाहेबांच्या जयघोषाने परिसर दणाणून गेला. या रॅलीचा समारोप बुद्धविहाराजवळ करण्यात आला. x x
कृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "Daraara "आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: Daraara"/ सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
0 टिप्पण्या
Thanks for reading