मुल पोलीस ठाण्याच्या हद्दीत सद्यस्थितीत चोरीच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. या पंधरवड्यात अनेक ठिकाणी चोऱ्या झाल्या आहेत.
मूल तालुक्यातील भेजगाव येथील सरपंच, सरपंच संघटनेचे अध्यक्ष अखिल गांगरेड्डीवार यांच्या मालकीच्या "न्यू देशी दारू" दुकानात अज्ञातांनी रविवारच्या रात्री मागच्या बाजूने लोखंडी ग्रील कटरने कापून दरोडा टाकला. यात चोरट्यांनी २१ पेट्या बियर तर एक देशी दारूची पेटी आणि जवळपास पाच हजार रुपये रोख असा ८५००० रु.चा मुद्देमाल चोरट्यांनी ल॑पास केला.
सोमवारला सकाळी देशी दारू दुकानाचे दिवाणजी अमोल अर्जुन शेंडे यांनी सकाळी सात वाजता देशी दारू दुकान उघडण्याकरिता गेले असता बाहेरचे शटर जैसे थे असून आतील रुमच्या दरवाजाला कुलूपच नसल्याने इतरत्र पाहणी केली असता मागच्या खिडकीचा ग्रील कटरने कापून दिसला.आणि आतील सामान अस्ताव्यस्त पसरलेले दिसल्याने लगेच त्यांनी ही घटना मालक अखिल गांगरेड्डीवार यांना कळविली. देशी दारू दुकानाचे मालक अखिल विलास गांगरेडीवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मूल पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
घटनेची माहिती होताच मूल उपविभागीय पोलीस अधिकारी मल्लिकार्जुन इंगळे व पोलीस निरीक्षक सुमित परतेकी यांनी आपल्या ताफ्यासह घटनास्थळी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी चंद्रपूर वरून ठसा तज्ञ व श्वानपधकाच्या साह्याने तपास केला गेला. घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी मल्लिकार्जुन इंगळे व पोलीस निरीक्षक सुमित परतेकी यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक पुरुषोत्तम राठोड हे आपल्या सहकाऱ्यांस करीत आहेत.
0 Comments