अरुण रामुजी भोले
नागभिड तालुका प्रतिनिधी
नागभीडः--- नागभीड तालुक्यातील कोटगांव आदर्श येथे संयुक्त जयंतीचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटक संजय माकोडे हे होते तर सह उद्घाटक सुनील वाघमारे सरपंच ग्रा.प.कोटगांव हे होते. कार्यक्रमाच्या अध्यक्ष पदी पुरषोत्तम बगमारे सामाजिक कार्यकर्ता हे होते तर प्रमुख पाहुने म्हणुन यशवंत भेंडारकर, आनंद जांभुळे, रंजना बांबोळे, छाया भेंडारकर, वैशाली पागोटे, विश्वनाथ कुंभरे हे होते. कार्यक्रमाचे मार्गदर्शक म्हणून डाँ. विशेष फुटाने व डाँ. प्रा. पुनम घोनमोडे हे होते. कार्यक्रमाची सुरवात दिपप्रज्वलीत करुन व स्वागत गीताने सुरु करण्यात आली. यावेळी प्रमुख मार्गदर्शक डाँ.विशेष फुटाने म्हणाले की या देशात खरी लोकशाही गौतम बुद्धाच्या कालखंडात होती. अडीज हजार वर्षापुर्वी लोकशाही अस्तित्वात होती तर ईतर देशात चारशे वर्षाआधी लोकशाही अस्तित्वात आली.गौतम बुद्ध हे कुणबी होते. ते शेती करणारे होते.ज्यांचा ज्यांचा संबंध बियांनासी आला ते सर्व कुणबीच आहेत. या लोकांना गौतम बुद्ध समजले नाही. एकही कुणब्याच्या घरी गौतम बुद्ध दिसत नाही. शिवाजी महारांजी समाधी शोधुन काढणारे म.फुले ओबीसींना कळाले नाही. शिवाजी महारांजाच्या निधनांतर शिवाजी महाराज गायब होते. माञ म.फुलेनी दोनशे वर्षानंतर शिवाजी महाराजांची समाधी शोधुन काढली व पहीली शिव जयंती साजरी केली आणी शीवाजी महाराजावर पोवाडा लिहीला. शिवाजी महाराजाच्या महाराजांच्या समाधीवर फुले वाहीले असता त्या भटाने जोड्याने फुले उधळली. तरी आम्ही फुले यांना समजु शकलो नाही. असा हा ओबीसी समाज आहे. झोपेचे सोंग घेऊन झोपलेला समाज आहे. या ओबीसी समाजांनी महा पुरुषांचा इतिहास समजुन घेने महत्वाचे आहे. प्रतेक ओबीसीच्या घरात शिवाजी महाराज व डाँ.बाबासाहेबांचा फोटो असायलाच पाहीजे. त्यानंतर कार्यक्रमाच्या दुसऱ्या मार्गदर्शक प्रा.डाँ.पुनम घोनमोडे यांनी रमाईचा त्याग आणी आजची महीला या विषयावर मोलाचे मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या की भारतीस संस्कृतीत प्रतेक यशस्वी पुरुषांच्या पाठीमागे महीलांचा हात आहे. जसे बाबासाहेबांना घडविन्या मागे रमाईचा हात आहे, शिवाजी महाराजांना घडविन्यात जिजावुंचा हात आहे तर ज्योतीबांना घडविन्यात साविञीमाईचा हात आहे. रमाईनी जिवनात खुप हाल अपेष्ठा भोगल्या.अनेकांचे मृत्यू बघितले. अनेक काबाड कष्ठ केले.पण कोणतीही तक्रार नाही केली.केव्हाही गरीबीचे प्रदर्शन केले नाही. बाबासाहेब परदेशात असतांनी समाज बांधवानी मदत देवु केली पण रमाईनी ती स्विकारली नाही. एवढी स्वाभीमानी रमाई होती. माञ अल्पवयामध्येच रमाईचे निधन झाले. हे बाबासाहेबासाठी अतिशय वेदनादायी ठरले. म्हणुन रमाईला आपण त्यागमुर्ती म्हणतो. कार्यक्रमाचे संचालन प्रदिप बांबोळे यांनी केले तर आभार आनंद मेश्राम पञकार यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तक्षशिला समीतीचे अध्यक्ष धनपाल निमगडे, सचिव संजय बांबोळे आणी समीतीचे पदाधिकारी यांचे फार मोठे योगदान आहे.
0 Comments