पोंभूर्णा:-तालुका प्रतिनिधी
पोंभूर्णा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीचा प्रचार चांगलाच शिगेला पोहचला आहे.दि.३० एप्रिल रोज रविवारला मतदार उमेदवारांच्या भविष्यावर शिक्कामोर्तब करणार आहे.सहकार क्षेत्रातील हि निवडणूक प्रतिष्ठेची असल्याने आप आपल्या अस्तित्वासाठी भाजप व महाविकास आघाडी शक्तीनिशी मैदानात उतरली असल्यामुळे प्रचारात चांगलाच धुरळा उडताना दिसत आहे.. तालुक्यामध्ये चर्चा आहे ती विमुक्त जाती-भटक्या जमाती गटातून नामांकित दैनिकाचे दोन पत्रकार एकमेकांसमोर उभे असल्यामुळे या मतदार संघाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महाविकास आघाडी तर्फे नगर पंचायतचे विरोधी गटनेता व शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) गटाचे तालुका प्रमुख आशिष कावटवार व भाजपचे माजी नगरसेविका यांचे पती नगर पंचायत निवडणुकीच्या तोंडावर भाजपातून काँग्रेसमध्ये जात उमेदवारी घेऊन पराभव झाल्याने निराश होत पुन्हा भाजपात प्रवेश घेऊन या गटातून उमेदवारी अर्ज दाखल करून मैदानात उतरले आहेत.
आशिष कावटवार आणि दिलीप मॅकलवार एकाच समाजाचे असल्यामुळे या गटामधील ही लढत प्रतिष्ठेची असणार आहे.
------------
पोंभूर्णा पत्रकार संघातील पदाधिकारी व नामांकित दैनिकांचे पत्रकार कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या राजकारणात आमने सामने आल्याने आरोप प्रत्यारोपांच्या फैरी देखील सुरु झाल्या आहेत.यात कोण बाजी मारणार हा येणारा काळच ठरवणारा आहे.मात्र महा विकास आघाडीचे आशिष कावटवार यांचा या निवडणुकीत पारडं जड असल्याचे एकंदरीत चित्र पाहायला मिळत आहे.
0 Comments