बाजार समितीच्या निवडणुकीची चुरस वाढली, मतदार गेले सहलीला: पोंभूर्णा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक - नऊ उमेदवारांची माघार -१८ संचालकासाठी आता ४० उमेदवार रिंगणात
पोंभूर्णा:- भाजपच्या ताब्यात राहिलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीवर महाविकास आघाडीची सत्ता कशी आणता येईल यासाठी रंगीत तालीम सुरू झाली आहे. या तालमीत मतदारांना अतिशय महत्त्व आले असून मतदार चक्क सहलीवर निघाले आहेत. राजकीय दृष्ट्या संवेदनशील समजल्या जाणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक येत्या ३० तारखेला होत आहे. राजकीय वाटाघाटी नंतर शेवटच्या दिवशी (२० एप्रिल) विविध गटातील नऊ उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करावयाच्या शेवटच्या दिवशी ५० उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. छाननीमध्ये एक अर्ज रद्दबातल ठरविण्यात आला होता. तर ४९ उमेदवारी अर्ज कायम होते. २० एप्रिल हा उमेदवारी अर्ज मागे घ्यायचा शेवटचा दिवस होता.शेवटच्या दिवशी नऊ अर्ज मागे घेतल्याने उर्वरित उमेदवारांसाठी निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. काँग्रेस, भाजपाच्या ठरलेल्या पॅनल व्यतिरिक्त केवळ चार उमेदवार जास्तीचे आहेत. ते कोणती भुमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे. २० एप्रिल ला सेवा सहकारी गटातून ४ उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले. त्यात वासुदेव गोपाळा पाल फुटाणा (सर्वसाधारण),दादाजी लक्ष्मण व्याहाडकर घोसरी (सर्वसाधारण),व (इमाव),ओमेश्वर बबनराव पद्मगिरीवार पोंभूर्णा (सर्वसाधारण)आणि नारायण पत्रु मोगरकार (सर्वसाधारण), यमुना रामदास परचाके (महिला) तसेच ग्रामपंचायत गटातून २ उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे, त्यात प्रशांत केसरी झाडे घोसरी (अनु. जाती जमाती) व ईश्वर शिवराम पिंपळकर (सर्वसाधारण) या शिवाय व्यापारी व अडते मतदार संघातून प्रितिश कवडूजी कुंदावार असे एकूण नऊ उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. भाजपा व काॅंग्रेसने निवडणूक व्युहरचना आखली असून मतदार कोणाच्या झोळीत मते टाकतील याकडे लक्ष लागले आहे.सध्यातरी दोन्ही पक्ष मतदारांना रिझविण्यात दंग झाले आहेत.
कृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "Daraara "आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: Daraara"/ सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
0 टिप्पण्या
Thanks for reading