Ticker

6/recent/ticker-posts

भास्कर आंबटकर यांच्या शेतातील वाघ पकडण्यात वन विभागाला अद्यापही अपयश


  •    ‌ मुल:नांदगाव-
  • गोवर्धन च्या मध्यभागी श्री भास्कर आंबटकर यांच्या शेतात, मक्यामध्ये उभ्या पिकात वाघ दडून बसला आहे. बघ्यांची गर्दी जमलेली आहे. वाघाला जेरबंद करून पकडण्यात यावे अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. परंतु सकाळी नऊ वाजता पासून दोन वाजेपर्यंत वन विभागाकडून कुठली कारवाई झाल्याचे दिसून येत नाही.
  •       प्रस्तुत प्रतिनिधीने शेतकऱ्यांशी संपर्क साधून प्रतिक्रिया विचारली असता सदर वाघाला बंदिस्त करण्यात यावे आणि शेतकऱ्यांची वाघाच्या भीतीपासून सुटका करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे. संबंधित शेतकऱ्याच्या मका पिकामध्ये वाघ दडलेला आहे. बघ्यांची प्रचंड गर्दी उसळलेली आहे.
  •       मूल पंचायत समितीचे माजी उपसभापती दशरथ वाकुडकर वाघाच्या दर्शनासाठी शेतातील शेजारील आंब्याच्या झाडावर चढून बसलेले आहेत. वाघाला हाकलून देण्यासाठी वन विभाग आपली भूमिका बजावत नसल्याची चर्चा सुरू आहे. एकंदरीत शेतकऱ्यांची मागणी पूर्ण करून जिवंत वाघाला बंदिस्त करून आपल्या जंगलात सोडणार की आपल्या विभागात सोडणार? याकडे वाघदर्शनासाठी येणाऱ्या लोकांचे लक्ष लागले आहे. त्यातच संबंधित शेतकरी भास्कर आंबटकर उसळलेल्या गर्दीमुळे त्यांच्या शेतीत असलेल्या आंब्याच्या आंब्याचे झाड, लिंबू इत्यादी शेत पिकाची अतोनात नुकसान होत आहे. याची भरपाई वन विभाग देणार आहे का? असा प्रश्न भास्कर आंबटकर या शेतकऱ्यांनी विचारलेला आहे.वन विभाग वाघाला पकडण्यात कितपत यशस्वी होतो याकडे जनतेचे लक्ष लागलेले आहे.

Post a Comment

0 Comments