पोंभुर्णा तालुक्यातील घोसरी येथे दहनविधीसाठी स्मशानभूमी नसल्याने तत्कालीन ग्रामपंचायत कमिटीने स्मशानभूमी शेडची मागणी केली होती. त्यानुसार सन 2018 ते 19 या वर्षात जन सुविधा योजनेअंतर्गत 4 लाख 38 हजार 660 रुपयाचे अंदाजपत्रकीय किमतीनुसार स्मशानभूमी सेडचे काम मंजूर करण्यात आले.
ग्रामपंचायत स्तरावरून एका ठेकेदाराला सदर काम देण्यात आले. ग्रामपंचायत ने संबंधित ठेकेदाराशी करारनामा करून बांधकाम पूर्ण करून देण्याची हमी घेतली होती. संबंधित कंत्राटदाराने ग्रामपंचायतीने ठरवून दिलेल्या जागेवर बांधकाम सुरू केले.
मात्र बांधकाम सुरू असताना संबंधित सदर कामाचे मूल्यांकन न करता एकूण कामापैकी 75 टक्के रकमेची उचल केल्याचे दिसून येते.वास्तविक पाहता झालेल्या कामाचे मूल्यांकन करून त्यानुसार संबंधित कंट्रात दाराला रक्कम अदा करणे हे तत्कालीन सरपंच सचिवांना बंधनकारक होते.परंतु कोणतेही मूल्यांकन न करता व संबंधित अधिकाऱ्यांच्या सूचनेचे पालन न करता तत्कालीन सरपंच सचिवांनी मूल्यांकन नसताना सुद्धा 4 लाख 38 हजार 660 रुपयाच्या एकूण रकमेपैकी तीन लाख 35 हजार रुपयाची उचल करून सदर कंत्राट दाराला देण्यात आल्याचे दाखविण्यात आले आहे.
काम पूर्ण न होता ७५ टक्के रक्कम संबंधित कंत्राटदाराला कशी देण्यात आली किंवा तत्कालीन सरपंच सचिवांनी सदरची उचल कशी केली.असा सवाल विद्यमान ग्रामपंचायतचे उपसरपंच जितू चौधरी यांनी केलेला आहे. सदर कामात भ्रष्टाचार करण्यात आलेला आहे.त्ज्ञामुळे उर्वरित स्मशानभूमी सेडचे काम रखडलेले आहे असा आरोप उपसरपंच जितू चौधरी यांनी केलेला आहे. घोसरी हे गाव अत्यंत प्रतिष्ठेचे असून याच गावातून तालुक्याचे राजकारण चालत असते परंतु या गावात मंजूर झालेल्या स्मशानभूमी शेडचे बांधकाम नसल्याने नाईलजास्तव येथील नागरिकांना लाल हेटी येथील स्मशानभूमीत प्रेतयात्रा घेऊन जावे लागते. आणि अंतयात्रेचा क्रियाक्रम पार पाडावा लागतो. ही शोकांतिका असून सदर काम केव्हा पूर्ण होणार अशी प्रतीक्षा येथील नागरिकांना आहे.
या कामातील भ्रष्टाचार करणाऱ्या दोषीवर कारवाई निश्चित करावी आणि स्मशानभूमी सेडचे बांधकाम पूर्ण करावे अशी मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रपूर यांच्याकडे घोसरी ग्रामपंचायतचे युवा उपसरपंच जितू चुधरी यांनी केलेली आहे.
खुद्द उपसरपंचानेच तक्रार केल्याने गावकऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. या प्रकरणात काय कारवाई होते याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
0 Comments