Ticker

6/recent/ticker-posts

नागभीड येथील बस्टॅन्ड च्या शौचालयात घाणीचे साम्राज्य.एस. टि.प्रशासनाचे शौचालयच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष.



अरुण रामुजी भोले
नागभिड तालुका प्रतिनिधी

नागभीड - ---येथील बस्टॅन्ड च्या परिसरात काही महिन्यांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने आमदार कीर्तिकुमार भांगडिया यांच्या स्थानिक विकास निधीतून प्रवास्यांकारिता सुलभ शौचालयाचे बांधकाम केले. या सुलभ शौचालयाची स्वच्छतेची जबाबदारी राज्य परिवहन विभागाकडे आहे. मात्र एस . टि. प्रशासनाकडून शौचालयाच्या स्वच्छतेकडे संपूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. सदर शौचालय बाहेरून जरी आकर्षक दिसत असले तरी आतून स्वच्छतेअभावी घाणीचे साम्राज्य दिसून येत आहे. यामुळे शौचालयात दुर्गंधी युक्त वातावरण असून प्रवास्यांना नाक झाकून शौचालयात जावे लागत असल्याचे दृश्य पाहावयास मिळते. विशेष करून स्त्रियांना शौचालयातील अस्वच्छतेमुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.शौचालयातील पाण्याच्या नळाला तोट्याच नाहीत.बरेचदा शौचालयात पाणी उपलब्ध राहत नाही. सध्यास्थीतीत शौचाल्याच्या टाकीला पाणी पुरवठा करणारी विहीर कोरडी पडली आहे. विहिरीला बोअरवेल ची पर्यायी व्यवस्था नाही.यामुळे प्रवास्यांपुढे नैसर्गिक विधी करिता कुठे जावे? असा प्रश्न निर्माण झाला असून एस. टि. प्रशासनविरोधात प्रवास्यांमध्ये तीव्र असंतोष व्यक्त केल्या जातं आहे. यावरून एस. टि. प्रशासन शौचालयच्या स्वच्छतेबाबत निष्क्रिय असल्याचे सिद्ध होत आहे.

''सदर शौचालयातील तोट्या चोरून नेलेल्या आहेत. तरीपण आमच्या निदर्शनास आल्यास नवीन तोट्या लावीत असतो. स्वच्छतेबाबत नगरपरिषदच्या स्वच्छता विभागास माहिती दिली आहे.लवकरच नवीन बसस्थानकाचे काम सुरु होणार असून सदर शौचालय पाडून नवीन शौचालयाचे बांधकाम होणार आहे "
   -नितीन झाडे, डेपो मॅनेजर ब्रम्हपुरी.

*"एस. टि. विभागाने सदर सुलभ शौचालय नगरपरिषद कडे हसतांतरित केलेले नाही. परंतु आम्हाला माहिती मिळाल्यास नगरपरिषदेचे कर्मचारी यांना शौचालयाच्या स्वच्छतेकारिता पाठवीत असतो*
   *यु. एच. शेंडे, अभियंता*
      *आरोग्य, स्वच्छता व पाणीपुरवठा विभाग*
*नगरपरिषद नागभीड*

Post a Comment

0 Comments