जुनगाव : प्रतिनिधी
आत्ता रात्री आठ वाजताच्या दरम्यान आकाशात मोठे मोठे ढग तयार होऊन वादळ वारा आणि मेघगर्जना सुरू झाली असून मोठा पाऊस येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
यामुळे पाऊस असो, वादळ असो की नसो, बत्ती गुल होणे ही तर नित्याचीच बाब झाली आहे. वादळ वारा नसताना दिवसातून अनेक वेळा जाणारी वीज अशा वातावरणात सुरळीत राहील ही अपेक्षा करणे चुकीचेच ठरेल. मात्र विज बिल गरीब असो की श्रीमंत ,हजार पेक्षा जास्त बिल पाठवण्याची आठवण मात्र महावितरण विसरत नाही.
हवामान विभागाने सुद्धा मोठ्या वादळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी व शेतकऱ्यांनी स्वतःची खबरदारी घ्यावी असे आवाहन तहसीलदार शुभांगी कनवाडे यांनी केले आहे.
0 टिप्पण्या
Thanks for reading