ओडीशातील बालासोर येथे झालेल्या अत्यंत भयंकर अशा रेल्वे अपघातानंतर दोन दिवसातच पुन्हा एकदा एक रेल्वे दुर्घटना घडली आहे.
ओडीशातील बरगढ येथे एका मालगाडीचे पाच डब्बे रुळावरून घसरले असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान ही भारतीय रेल्वेची मालगाडी नसून एका खासगी सिमेंट कंपनीची त्यांच्या कारखान्याच्या आवारातील मालगाडी असल्याचे समोर आले आहे.
शुक्रवारी संध्याकाळी ओडिशात बाहानगर बाजार स्टेशन येथे झालेल्या शतकातील सर्वात भीषण रेल्वे अपघात झाला. शालिमार-चेन्नई कोरोमंडल एक्प्रेस मालगाडीला धडकली आणि डबे घसरले. त्याचवेळी येणारी बंगळुरू- हावडा सुपरफास्ट एक्प्रेसची कोरोमंडल एक्प्रेसच्या डब्यांना धडकली. यामुळे बंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्प्रेसचेही डबे घसरले आणि एकच गोंधळ उडाला. या अपघातात 288 जणांचा मृत्यू झाला असून एक हजारांवर प्रवासी जखमी झाले आहेत.
आज सोमवारी झालेल्या रेल्वे अपघातात सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नसल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले आहे.
0 Comments