नेता व कार्यकर्ता असा असला पाहिजे, उभरते युवा नेतृत्व "राहुल भाऊ पाल"
नेता पुढारी कार्यकर्ता व राजकारण म्हणजे भ्रष्टाचार, पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा कमावण्याचा धंदा, पुढाऱ्यांची पोकळ आश्वासने सर्वसामान्य लोकांच्या मनातील राजकारण्याविषयीची भावना झाली आहे.
या सर्व गोष्टींना अपवाद व कोणत्याही परिस्थितीत सर्वांशी मिळून मिसळून आग्रहाचे संबंध निर्माण करणारे पोंभुर्णा तालुक्यातील एक उभरते युवा नेतृत्व म्हणजे राहुल भाऊ पाल,
सध्याचा काळच असा आहे की, रांजणकारणात व समाजकारणात सगळीकडे दलदल माजली आहे. नेते पुढारी,यांच्यावर जनतेचा कवळीचा ही भरोसा राहिला नाही. पांढऱ्या खादीतल्ज्ञा कोणालाही हात लावा भ्रष्टाचाराचं काळं हाताला लागल्याशिवाय दुसरं काही मिळत नाही. परंतु आपल्या तालुक्यात असे एक नेतृत्व उभरते आहे, राहुल भाऊ पाल नावाचे वादळ! त्यांच्या कमी वयातील भरीव कामगिरीमुळे त्यांच्याकडे तालुक्यातील लोक आशेने बघत आहेत. हा 25 वर्षांचा तरुण सतत गोरगरीब जनतेच्या सेवेत उपलब्ध होत असतो. गरीब असो की श्रीमंत त्यांच्याजवळ या गोष्टीला स्थान नाही. सगळ्यांना ते जवळ करून घेतात आणि ते सगळ्यांशी मिळून, मिसळून राहतात.
त्यांच्यावर तालुक्यातील भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष पद आहे. ते जुनगाव या ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच आहेत. या विभागाचे आमदार तथा मंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार, व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवराव भाऊ भोंगडे यांचे ते खास विश्वासू व जवळचे कार्यकर्ते म्हणून प्रसिद्ध आहेत.
कुठलेही काम त्यांच्याकडे घेऊन गेले की त्यांचे ते काम केल्याशिवाय गप्प बसत नाही. त्यामुळेच त्यांनी तालुक्यामध्ये नव्हे जिल्ह्यातही आपल्या कर्तुत्वाची छाप पाडली आहे. नेते गिरी स्वतःच्या कुटुंबाच्या कल्याणासाठी नाही तर जनता जनार्दन धनासाठी आहे हे त्यांनी जाणलं. आणि म्हणूनच आपलं तन, मन, धन, सेवा, वेळ असं सगळं जनता जनार्दनाला अर्पण केलं आहे. जनताही त्यांना जवळचा नेता मानायला लागली.
शेती, पाणीपुरवठा, वीज , रोजगार हमी योजना, कापूस एकाधिकार योजना ,शेतीमालाचे भाव , इत्यादी प्रश्नावर आपल्या निवेदनाच्या माध्यमातून मंत्रिमहोदयांना अवगत करून अनेक विकास कामे त्यांनी मार्गी लावली आहेत.
त्यांचे साधे राहणीमान, कोणताही बडेजाव नाही, सर्वसामान्य माणसांमध्ये मिसळून त्यांची तळमळीने विचारपूस करणारे नेतृत्व म्हणून ते उदयास येत आहेत. म्हणूनच त्यांना तालुक्याच्या "राजकीय क्षितिजावरील नवा धुमकेतू" असे संबोधले जाते.
0 Comments