पोंभुर्णा: कालपासून तालुक्यात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून वैनगंगा नदीला पूर आलेला आहे.
गोसे खुर्द धरणाचे संपूर्ण ३३ पैकी 33 दरवाजे उघडले गेले असून बारा दरवाजे अर्धा मीटरने तर 21 दरवाजे एक मीटरने उघडले गेले आहेत. संपूर्ण 33 दारातून 5955.85 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळे वैनगंगा नदीला पूर आला आहे. या पुरामुळे जळगावच्या वैनगंगा नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने रहदारी ठप्प झाली आहे. जून गाव ते नांदगाव हे 7 किलोमीटरचे अंतर बावीस ते पंचवीस किलोमीटर वाढले आहे. अर्थात जुनगाव ते गंगापूर, गंगापूर ते चेक ठाणा ,नवेगाव मोरे नंतर नांदगाव असा प्रवास करावा लागत आहे.
या पावसामुळे अनेकांच्या घराची गळती सुरू आहे. त्याचा फटका गोरगरीब, झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांना बसत आहे. भास्कर गेडाम या गरीब आदिवासी शेतमजुराच्या झोपडी वजा घरात दरवर्षीच पावसात पाणी साचून पाण्याखालीच वास्तव्य करावे लागत आहे.
0 टिप्पण्या
Thanks for reading