दिवंगत ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी मराठी मनांत अजरामर राहतील - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/कामगार समस्या सल्लागार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
मुंबई - ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या निधनामुळे मराठी चित्रपट सृष्टी ची कधीही भरून येणार नाही अशी हानी झाली आहे. आपल्या कसदार अभिनयाचा अमिट ठसा मराठी सिनेसृष्टीवर उमटविणारे ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी मराठी चित्रपट रसिकांच्या मनांत कायम अजरामर राहतील अशा शब्दांत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी दिवंगत ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
दिवंगत ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांनी अनेक मराठी सिनेमात काम केले. त्यांनी साकारलेल्या भूमिका अजरामर ठरल्या. मुंबईचा फौजदार मधील त्यांची भूमिका लोकप्रिय झाली. ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या निधनाने अभिनयाचा तेजस्वी तारा निखळला आहे अशी शोकभावना ना.रामदास आठवले यांनी पाठवलेल्या शोकसंदेशात व्यक्त केली आहे.
0 टिप्पण्या
Thanks for reading