जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/कामगार समस्या सल्लागार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
मुंबई: न्यायालयाचा शिंदे सरकारला दणका! सरकार कडून मराठा आंदोलकांना अचानक अटक अन् माननीय न्यायालयाकडून निर्दोष सुटका...... साधा FIR देखील दाखल करू दिला नाही. माननीय न्यायालयाने आझाद मैदानावर मराठा वनवास यात्रा सुरूच ठेवण्याची दिली परवानगी. ऍड रोहन जी काकडे व त्यांच्या सोबतच्या सर्व मराठा वकील बांधवांचे मनापासून आभार... येत्या 17 तारखेला जास्तीत जास्त मराठा बांधवांनी आझाद मैदानावर हजर राहावे.
कोर्टात पोलिसांच्या कडून हास्यास्पद मागण्या केल्या गेल्या. या आंदोलकांच्या मुळे महाराष्ट्रात सामाजिक तेढ निर्माण होत आहे. यांना पावसाळी अधिवेशन काळात मुंबई मध्ये आंदोलन करण्यास मज्जाव करा. यांच्या या मागणीतून सरकार ची मानसिकता दिसून आली. म्हणजे अधिवेशन काळात मराठ्यांची मागणी सभगृहात चर्चेलाच येऊ नये. म्हणजे केवळ राजकीय दबावापोटी आम्हाला उचलले हे स्पष्ट होत होते. आणखीही किरकोळ आरोप सरकार कडून ठेवले गेले पण न्यायालयाने ते अमान्य केले.
ओबीसी आरक्षणसाठी आझाद मैदानावर ठाण मांडून असलेल्या मराठा वनवास यात्रेतील तरुणांना सरकारच्या सांगण्यावरून पोलिसांनी अचानक आझाद मैदानावरून उचलले. पोलिस ठाण्यात नेऊन एका कोठडीत रात्रभर डांबून ठेवले. आमचे फोन काढून घेऊन घरच्यांना देखील बोलू दिले नाही. आमचा नेमका गुन्हा काय? हेही सांगितले गेले नाही. आम्हाला मानसिक दृष्ट्या त्रास देण्याचा सर्व बाजूंनी प्रयत्न केला गेला. असो,...
आम्ही एक महिना आधीपासून तिथे आझाद मैदानावर राहत होतो. पण काही दिवसांपूर्वीच छगनराव भुजबळ सत्तेत आले आणि दोन तीन दिवसांपासून आम्हाला अडचणी सुरू झाल्या. एक दिवस आधी आमच्या गाड्या उचलून नेल्या. दुसऱ्या दिवशी आम्हाला बेकायदेशीररित्या उचलून नेले. माझ्यावर तर जुन्या खोट्या गुन्ह्यांची यादी काढून मला अडकवण्याचा प्रयत्न केला गेला. पण कुणाचेही काहीही चालले नाही. तसेही गुन्ह्यांना घाबरणारे आम्ही मराठे नाहीत.
पण भुजबळ साहेबांना अजुन गरीब मराठा समाजाच्या तरुणांचा हाबाडा माहिती नाही. येत्या इलेक्शन मध्ये तुमचा करेक्ट कार्यक्रम नक्की आहे. देवेंद्र फडणवीसजी यांना देखील कालची कार्यवाही जड जाणार हे निश्चित. एकनाथ शिंदे साहेब तुमची खुर्ची निघून जाण्याच्या आधी आझाद मैदानावर या खुल्या मैदानात मराठ्यांशी चर्चा करा. ओबीसी आरक्षण लागू करा. तुमचे फोटो गावागावात मराठ्यांच्या घरोघर देव्हाऱ्यात लागतील. ही संधी घ्यायची का दवडायची हे तुम्हीच ठरवा.
आम्ही ओबीसी मधून आरक्षण मिळवल्या शिवाय माघार घेणार नाही.
0 टिप्पण्या
Thanks for reading