महाराष्ट्रातील घडणाऱ्या घडामोडीवर आधारित बातम्या आणि सर्व प्रकारचे लेख कविता येथे प्रकाशित केले जातात... News blog... Darara 24 tas...https://daraara24.blogspot.com
"Hindi Marathi news website" "daraara 24 Taas News Network"gavakadchya batmya "rajkiya bhukamp
#daraara24taas
वैनगंगा नदी ला पाचव्यांदा पुर
लिंक मिळवा
Facebook
X
Pinterest
ईमेल
अन्य अॅप्स
-
वैनगंगा नदी ला पाचव्यांदा पुर आल्यामुळे जुनगावची रहदारी बंद झाली आहे.
नांदगावात एकाच रात्रीत नऊ दुकाने फोडली, व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण मुल: तालुक्यातील राजकीय दृष्ट्या अतिसंवर्धनशील असलेल्या व मोठी बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध असलेल्या नांदगाव येथे रविवारी दिनांक 9 सप्टेंबर च्या मध्यरात्री नांदगाव येथील नऊ दुकानांना चोरट्यांनी लक्ष केले. दुकानांचे शटर वाकवून गावातील बस स्थानक परिसरात वेगवेगळ्या भागात असलेल्या नऊ दुकानांमध्ये चोरी करण्यात आली. यात एका बार अँड रेस्टॉरंट चा समावेश असून सर्व ठिकाणचा चोरीस गेलेला एकूण मुद्देमाल जवळपास लाखाच्या घरात आहे. दीड ते अडीच वाजताच्या दरम्यान हा सर्व प्रकार घडला असावा असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. काही दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चोर येताना आणि चोरी करताना दिसत आहेत. यावरून हे सर्व कृत्य एकाच टोळीचे असावे असा अंदाज व्यक्त होत आहे. नांदगाव पासून केवळ दोन किलोमीटर अंतरावर पोलीस चौकी असताना वारंवार असे प्रकार घडतात.त्यामुळे आता पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पिंपरी देशपांडे येथिल कापूस वेचणाऱ्या महिलेवर वाघाचा हल्ला.. दरारा २४ तास न्युज नेटवर्क... विजय जाधव (तालुका प्रतिनिधी) नांदगाव: पोंभुर्णा तालुक्यातील पिंपरी देशपांडे शेतशिवारात कापूस वेचण्यासाठी गेलेल्या महिलेवर शेतात दबा धरून असलेल्या वाघाने हल्ला करून गंभीर जखमी केले. परंतु सोबतच्या महिलांनी आरडाओरडा केल्यामुळे वाघ पळून गेला. वाघाच्या हल्ल्यात रसिका अंकुश कुमरे (२८) रा. पिपरी देशपांडे ही गंभीररीत्या जखमी झाली आहे. ही घटना काल रविवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरलेले आहे. पोंभूर्णा वनपरिक्षेत्राअंतर्गत चकठाणा- पिपरी देशपांडे-गोवर्धन शेतशिवारात मागील अनेक दिवसांपासून वाघाची दहशत असून शेती हंगाम अडचणीत असलेले आहे. दिवसेंदिवस वाघाचे वावर वाढलेले असल्याने वन्यप्राणी-मानव संघर्ष होण्याची भीती व्यक्त करून वाघाचा त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच वनक्षेत्र सहायक अजय बोधे व सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी महिलेला उपचारासाठी सामान्य रुग्णालयात दाखल केले. पुढील उपचार केले जात आहेत.
नांदगाव जवळ भीषण अपघात। कंपनीच्या सुपरवायझर चा जागीच मृत्यू नांदगाव: विजय जाधव मुल: नांदगाव कडून गोंडपिपरीच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीचा गोवर्धन स्मशानभूमी वळणावर अपघात झाल्याने या अपघातात फोन लाईनचे काम करणारे सुपरवायझर सागर मिश्रा वय 25 रा.नागपूर यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी रात्री उघडकीस आली.घटनेची माहिती बेंबाळ पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. पुढील कारवाई प्रशांत गायकवाड मेजर व त्यांचे सहकारी करत आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा