Ticker

6/recent/ticker-posts

तरुणाची मृत्यूशी झुंज अखेर थांबली! जुनगाव येथील तरुण राकेश गेडेकर यांचे निधन





तरुणाची मृत्यूशी झुंज अखेर थांबली! जुनगाव येथील तरुण राकेश गेडेकर यांचे निधन

जुनगाव: मागील वर्षी जुनगाव येथील राकेश मारुती गेडेकर या तरुणाला कॅन्सर या जीवघेण्या आजाराने घेरले. तेव्हापासूनच त्याचे नागपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर त्यांना आराम वाटू लागल्याने डॉक्टरांनी त्यांना सुट्टी देऊन घरी पाठवले होते.

मात्र देवाच्या मनात काही वेगळेच असावे म्हणून की काय?ते घरी आल्यानंतर पुन्हा त्यांची तब्येत बिघडली. त्यांच्या तब्येतीसाठी नागपूरची वारी सततची सुरूच होती. परंतु आज दिनांक 16 ऑगस्ट 2023 रोजी पहाटे चार वाजता चे सुमारास त्यांची मृत्यूची झुंज थांबली आणि गावात एकच शोक कळा पसरली. राकेश गेडेकर वय तीस वर्ष या तरुणाचा त्यांचे राहते घरीच मृत्यू झाला.


राकेश हा तरुण मनमिळावू, सर्वांशी खेळीमेळीने आणि मित्रत्वाने वागणारा असल्यामुळे सर्वांचा चाहता होता. त्याचा चाहता वर्ग गावात मोठ्या प्रमाणात आहे. त्यांच्या निनाची वार्ता पसरतात गावात हळ - हळ व्यक्त करून शोक व्यक्त केला जात आहे.

आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा असल्याने त्यांच्यावर खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या तरुणाचा दोन वर्षांपूर्वीच विवाह झाला होता. त्यांच्या मागे पत्नी, एक वर्षीय मुलगा, आई वडील, विवाहित बहिणी असा परिवार असून या सर्वांनी खूप मोठा हंबरडा फोडला आहे.

Post a Comment

0 Comments