Ticker

6/recent/ticker-posts

CDCC बँकेच्या नांदगाव शाखेतून मिळाली नकली पाचशेची नोट !


CDCC बँकेच्या नांदगाव शाखेतून मिळाली नकली पाचशेची नोट !


मूल/ प्रतिनिधी 

  चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक दरवर्षी लाखो रुपये खर्च करून अद्यावत मशनरी खरेदी करीत असते. एवढे असताना बँकेच्या मूल तालुक्यातील नांदगाव शाखेतून बेंबाळ येथील एका शिक्षकानी काही रक्कम काढली व ती रक्कम मूल येथील भारतीय स्टेट बँकेत भरण्यास गेले असता त्यातील एक पाचशेची नोट मशीन द्वारे नकली निघाली. यावरून पाचशेच्या नकली नोटांचा सुळसुळाट जिल्हा मध्यवर्ती बँकेत दिसुन येत असल्याने बँकेच्या कार्यशैलीवर शंका व्यक्त केली जात आहे.

शेतकरी व सर्वसामान्यांची बँक म्हणुन 

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे नाव घेतले जाते. बँकेची उलाढाल बघता व्यवहार जलद गतीने व्हावा यासाठी लाखो रुपये खर्च करून दरवर्षी अद्यावत मशनरी खरेदी केल्या जात आहे. त्या मशनरीच्या साह्याने नोंटाची स्कांनिग व मोजणी केली जाते. त्यामुळे बँकेत जवळ असलेल्या नोटा ह्या खऱ्या असणे अपेक्षित असते. माञ 

बेंबाळ येथील शिक्षकानी मूल तालुक्यातील बँकेच्या नांदगांव शाखेतून रक्कम काढून ती रक्कम मूल येथील भारतीय स्टेट बँकेत जमा करण्यास गेले असता स्कानिंग मध्ये पाचशे रुपयाची नोट क्रमांक आय एन ई ३०४७०२ ही नोट नकली आढळली. बँकेला दोन दिवसांची सुट्टी असल्याने हे १७ ऑगस्ट ला बँकेत गेले असता बँकेच्या प्रशासनाने चूक मान्य करीत चंद्रपूरच्या मुख्य शाखेतून आली असल्याचे सांगितले मात्र याबाबत कुठेही वाच्यता करण्यास मनाई केली. बँकेच्या मुख्य कार्यालयातूनच नकली नोटा येत असतील तर याचे रॅकेट असावे असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.याबाबत चौकशी करण्याची मागणी जनतेनी केली आहे.

Post a Comment

0 Comments