विवेकानंद वरिष्ठ महाविद्यालय बेंबाळ येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन
स्थानिक विवेकानंद वरिष्ठ महाविद्यालयात ९ आगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान रा.से. यों. विभागामार्फत का.प्राचार्य कमल एन. हिरादेवे यांच्या मार्गदर्शनात मेरी माती मेरा देश अभियानांतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यात महाविद्यालय तसेच ग्रामपंचायत बेंबाळ यांच्या संयुक्त विद्यमाने पंचप्राण शपथ घेण्यात आली.
तसेच विविध फळ झाडे व फुल झाडांची लागवड करून अमृत वाटिका तयार करण्यात आली.
या प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष मा.सुरेशराव अहिरकर, सहसचिव तुकारामजी पेटकुले, मा. मुकुंदाजी वाढई, मा. नात्थुरावजी आरेकर, चिंतामणजी तिमाडे,दिपकजी वाढई, बेबाळ चे सरपंच मा.चांगदेव केमेकर , उपसरपंच मा.देवाजी ध्यानबोईवार ,ग्रामसेवक उमेशजी आक्कुलावर तसेच समस्त ग्रामपंचायत सदस्य,कार्यक्रम अधिकारी प्रा.सोनाली उमक,प्रा.सोनुले,प्रा चव्हाण,प्रा देशमुख,प्रा भासरकर,प्रा रामटेके तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थितीत होते.
0 Comments