Ticker

6/recent/ticker-posts

भूमी अभिलेख कार्यालयातील बेजबाबदार, कर्तव्यशुन्य, कामचुकार, व्यसनाधिन, लाचखोर कर्मचारी जाधव यांची बदली करा - पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना दिलेल्या निवेदनातून मागणी


भूमी अभिलेख कार्यालयातील बेजबाबदार, कर्तव्यशुन्य, कामचुकार, व्यसनाधिन, लाचखोर कर्मचारी जाधव यांची बदली करा - पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना दिलेल्या निवेदनातून मागणी

पोंभुर्णा:तालुका भुमि अभिलेख कार्यालय पोंभूर्णा येथे कार्यरत असलेले शिरस्तेदार श्री. ता. बा. जाधव आहेत. यांच्याकडे कार्यालयामधून नक्कल पुरविणे व त्यावर स्वाक्षरी करण्याची जबाबदारी आहे. परंतु हे कायम स्वरुपी कित्येक दिवस वारंवार गैरहजर असतात. ज्या दिवशी कार्यालयात हजर असतात तेव्हा ते दारु पिऊन नशेत तर्र असतात. त्यामुळे कार्यालयात आलेल्या शेतकरी व विद्यार्थीसोबत अशम्य व अशोभनीय कृत्य करतात. नागरीकांना विहीत मुदतीत नक्कल मिळत नाही. ज्या नागरीकांना नक्कल पुरविण्यात येते त्या नागरीकाकडून ते नेहमी लाच मागत असतात. कार्यालयात बायोमेट्रीक हजेरी नसल्याने त्याचा ते गैरफायदा घेऊन शासनाचे लाखो रुपयाचे दर महिन्याचे पूर्ण वेतन उचल करून शासनाची दिशाभुल करीत आहेत.

यावर कोणत्याही कर्मचारी व संबंधीत अधिकाऱ्याचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे तालुक्यातील नागरीकांना मुलांच्या शिक्षणाकरीता, घरकुलाच्या कामाकरीता व शेतीची दस्तऐवज तयार करण्याकरीता वेळेवर कागदपत्रे मिळत नाहीत. अशावेळी कित्येक विद्यार्थ्यांना शाळा प्रवेश, जात वैधता प्रमाणपत्र पासून वंचीत राहावे लागत आहे. या सर्व बाबीमुळे तालुक्यातील नागरीकांना नाहक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे.

यासंदर्भात संबंधीतावर कार्यवाही व्हावी म्हणून वरीष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी / तोंडी तक्रार केल्या होत्या. परंतु आजपर्यंत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अतिशय बेजबाबदार, कर्तव्यशुन्य, कामचुकार, व्यसनाधीन, लाचखोर कर्मचाऱ्याची पाठ राखण केलेली असून संबंधीतावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आलेली नाही. असा आरोप निवेदनकर्त्यांनी आणि शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनातून केलेला आहे.

अशा लाचखोर ते जबाबदार व्यसनाधीन कर्मचाऱ्याला शिक्षा देणे आवश्यक आहे., आपल्याकडून वरील सर्व बाबींची सखोल चौकशी करून चौकशीअंती दोषी आढळल्यास विषयांकित कर्मचाऱ्याची आज तारखेपासून १५ दिवसाच्या आत तात्काळ बदली करण्यात यावी. अन्यथा तालुक्यातील संपूर्ण जनतेला सोबत घेऊन तीव्र आंदोलन करण्यात येईल व भविष्यात होणाऱ्या अनुच्चीत प्रकारास आपले प्रशासन सर्वस्वी जबाबदार राहिल असा सज्जड इशारा निवेदनातून देण्यात आलेला आहे. सदर निवेदन जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनाही देण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments