24 गावांचा डोलारा दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर! ग्रामपंचायत ने पद भरण्याची केली मागणी



===================
24 गावांचा डोलारा दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर! 

उपसरपंच देवाजी राजू ध्यानभोईवार यांनी पद भरण्याची केली मागणी


जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन सादर
===================
जुनगाव: (अजित गेडाम)
===================
मुल पोलीस ठाणे अंतर्गत बेंबाळ पोलीस चौकीत केवळ दोन पोलीस कर्मचारी कार्यरत असल्याने परिसरातील सुरक्षा व्यवस्था कोलमडली आहे. परिणामी अनेक प्रकारचे गुन्हे ,घरफोड्या, चोऱ्या वाढलेल्या आहेत. ही बाब लक्षात घेऊन ग्रामपंचायत बेंबाळाचे उपसरपंच श्री देवाजी राजू ध्यानभोईवार यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन रिक्त जागा भरण्याची मागणी केली आहे.

या पोलीस चौकीत एकूण सात पदे मंजूर असताना केवळ दोनच पोलीस कर्मचारी 24 गावांचा डोलारा सांभाळत आहेत. त्यामुळे त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या पोलीस चौकी अंतर्गत बेंबळ,नांदगाव, घोसरी, पिपरी देशपांडे, दिघोरी, फुटाणा, नवेगाव भुजला, जुनासुरला, बोंडाळा बुद्रुक, बोंडाळा खुर्द, देवाडा बुद्रुक देवाडा बुद्रुक, इत्यादी गावांचा समावेश असून भौगोलिक दृष्ट्या ही गावे फेरफटका मारण्यास अडचणीचे आहेत. कारण पोलीस ठाणे मूल असले तरी, या ठाण्याअंतर्गत पोंभुर्णा तालुक्यातील अनेक गावे या ठाण्याशी जोडलेली आहेत.

पुरेशा पोलीस कर्मचाऱ्या अभावी जनतेची सुरक्षा वाऱ्यावर आहे. या गंभीर बाबीची पोलीस प्रशासनाने दख्खन घेऊन तात्काळ पद भरावे अशी मागणी ग्रामपंचायत बेंबाळ चे उपसरपंच देवाजी राजू ध्यानभोईवार यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे कडे निवेदनाद्वारे केली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नांदगावात एकाच रात्रीत नऊ दुकाने फोडली, व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

पिंपरी देशपांडे येथिल कापूस वेचणाऱ्या महिलेवर वाघाचा हल्ला

नांदगाव जवळ भीषण अपघात। कंपनीच्या सुपरवायझर चा जागीच मृत्यू