फीस्कुटी शेत शिवारात वाघिणीचा मृत्यू! वन विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह?



फीस्कुटी शेत शिवारात वाघिणीचा मृत्यू! वन विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह?

जुनगाव:(अजित गेडाम)
मुल तालुक्यातील फिस्कुटी येथील शेत शिवारात वाघीण मृतावस्आथेतढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.पोंभर्णा वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या परंतु मूल तालुक्यातील गावातील शेतशिवारात शेतावर काम करायला गेलेल्या महिलांना सदर वाघीण वृत्तावस्थेत आढळून आली. महिलांनी शेतमालकाला याची माहिती दिली. शेतमालकाने सरपंच यांचेशी संपर्क साधून वनविभाग पोंभुर्णा यांना कळविण्यात आले.

माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी घटनास्थळावर दाखल होऊन घटनास्थळ पंचनामा केला.

विशेष म्हणजे याच वनपरिक्षेत्रात मागील काही महिन्यापूर्वी नांदगाव येथील शेत शिवारात अशाच एका मोठ्या वाघिणीचा संशयास्पद मृत्यू झाला होता. एकापाठोपाठ एक असे वाघांचे मृत्यू होत असताना वनविभाग गुंगीचे औषध खाऊन गप्प बसले असल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नांदगावात एकाच रात्रीत नऊ दुकाने फोडली, व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

पिंपरी देशपांडे येथिल कापूस वेचणाऱ्या महिलेवर वाघाचा हल्ला

नांदगाव जवळ भीषण अपघात। कंपनीच्या सुपरवायझर चा जागीच मृत्यू