भटारी येथील आदिवासी शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू


भटारी येथील आदिवासी शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

पोंभुर्णा: तालुक्यातील भटारी येथील 35 वर्षीय तरुण शेतकरी कपिल एकनाथ आलाम यांचा शेतात काम करीत असताना सर्पदंशाने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी तालुक्यात घडली.

सदर शेतकरी स्वतःच्या शेतात काम करीत असताना सायंकाळी सहाच्या सुमारास त्याला सर्पदंश झाला. घरी आल्यानंतर त्यांनी घरच्यांना उशिरा माहिती सांगितली. त्यामुळे त्यांना रुग्णालयात नेण्यास विलंब लागला. तद्वतच जोराचा पाऊस सुरू असल्याने दवाखाना गाठणे कठीण झाले होते.

दवाखान्यात उशिरा पोहोचल्यामुळे त्यांचे वर उपचार होण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे कुटुंब शोकसागरात बुडाले आहे.घटनेची नोंद पोलिसांनी घेतली असून या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नांदगावात एकाच रात्रीत नऊ दुकाने फोडली, व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

पिंपरी देशपांडे येथिल कापूस वेचणाऱ्या महिलेवर वाघाचा हल्ला

नांदगाव जवळ भीषण अपघात। कंपनीच्या सुपरवायझर चा जागीच मृत्यू