*घुग्घुस ते पडोली मार्गा वरील खड्डे लवकरात लवकर बुझवा -*
*अन्यथा युवासेना तर्फे शिवसेना स्टाईल ने आंदोलन करू -
युवासेना उपतालूका प्रमुख सुश्मित गौरकार यांचा इशारा*
चंद्रपूर : घुघ्घुस ते पडोली मार्ग अत्यंत खड्डेमय झाला असून या मार्गावर अनेक अपघात झाले आहेत.ही समस्या लक्षात घेऊन युवासेना उपतालुकाप्रमुख सुश्मित गौरकर यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले.
दि.०७/०९/२०२३ रोजी शिवसेना जिल्हा प्रमुख संदीप भाऊ गिर्रे व युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत भाऊ सहारे यांच्या मार्गदर्शनात आणि युवासेना उपजिल्हाप्रमुख हेमराज भाऊ बावणे व शिवसेना तालुका समन्वयक विकासभाऊ विरुटकर याच्या नेतृत्वाखाली सुश्मित गौरकार याच्या पुढाकारातून धानोरा टोल प्लाझा ला निवेदन देण्यात आले.
घुग्घुस ते पडोली मार्गा वर मोठे मोठे खड्डे पडलेले असून या खड्ड्यांमुळे कित्येकदा अपघात झालेले आहे. आणि अपघातामुळे कित्तेक लोकांचे जीवही गेले आहे. या संबंधीत वारंवार निवेदन दिले आहे.
निवेदन दिल्या नंतर सुद्धा निकृष्ट दर्जाचे काम करण्यात येते आणि काही दिवसानंतर तीच परिस्थिती निर्माण होते. या वर कायमचा तोडगा काढून लवकरात लवकर काम करण्यात यावे, तसे न झाल्यास युवासेना तर्फे शिवसेना स्टाईल मध्ये आंदोलन करण्यात येईल. असा इशारा निवेदन मार्फत देण्यात आला आहे.
यावेळी ज्ञानेश्वर लोनगाडगे युवासेना तालुका समन्वयक,सज्जन सातपुते उपसरपंच ग्राम. नागाळा सि.,चेतन कामडी युवासेना शाखाप्रमुख,शुभम घागरगुंडे,आकाश भोजेकर,कुणाल ऊईके,जाफर अन्सारी युवासैनिक उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Thanks for reading