Ticker

6/recent/ticker-posts

विज बिल थकल्याने बेंबाळ प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा पाणीपुरवठा दहा दिवसापासून बंद ----------------------------------------- ऐन पावसाळ्यात महिलांची भटकंती : कंत्राटदाराचे दुर्लक्ष-ग्रामपंचायतीने लक्ष देण्याची गरज


विज बिल थकल्याने बेंबाळ प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा पाणीपुरवठा दहा दिवसापासून बंद
-----------------------------------------
ऐन पावसाळ्यात महिलांची भटकंती : कंत्राटदाराचे दुर्लक्ष-ग्रामपंचायतीने लक्ष देण्याची गरज
------------------------------------------

जुनगाव : मुल तालुक्यातील बेंबाळ प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा पाणीपुरवठा गत दहा दिवसापासून बंद असुन कंत्राटदाराच्या दुर्लक्षितपणामुळे परिसरातील महिलांना ऐन पावसाळी दिवसामध्ये पिण्याच्या शुद्ध पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली असल्याने संताप व्यक्त केल्या जात आहे.
         बेंबाळ प्रादेशिक योजनेमध्ये नवेगाव(भुज), कोरंबी, बाबराळा, चेक दुगाळा, नांदगाव, घोसरी, गोवर्धन या गावाचा समावेश आहे. सदर योजना शुध्द पाणी पुरवठा योजनेसाठी कार्यन्वीत असली तरी संबंधित कंत्राटदार मनमानी धोरण अवलंबिले असल्याने नियमित पाणी पुरवठा होत नाही. त्यामुळे परिसरातील नागरिकांना अन्य स्त्रोतांतील अशुध्द पाण्यावर तहान भागविण्यासाठी ऐन पावसाळ्यात महिलांना भटकंती करण्याची वेळ आली आहे.
           बेंबाळ प्रादेशिक योजनेचा पाणी पुरवठा नियमित होत नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. यापूर्वीचे कंत्राटदार पाणी पुरवठा खंडित होताच लागलीच दुरुस्ती करण्याची तत्परता दाखवीत होते. परंतू सद्याचे कंत्राटदार पाणी पुरवठा करण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.परिसरातील नागरिकांना अन्य स्त्रोतांतील गढुळ पाण्यावर तु्ष्णा भागविताना भटकंती करण्याची नामुष्की ठेकेदाराने लादली आहे. 
           ऐन पावसाळ्यात शुध्द पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना आक्रोश करावा लागत असल्याने संबंधितांनी गांभीर्याने पाणी पुरवठा सुरु करावा अशी मागणी संबंधित गावांतील नागरिकांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments