जुनगाव: पावसाने दडी मारल्याने परिसरातील शेतकरी पाण्याच्या प्रतीक्षेत आहे. मुल तालुक्यातील शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला असून पाटाचे पाणी सुद्धा मिळत नसल्याने शेतकरी आक्रोशीत झाला होता.
निसर्गाने धोका दिल्यानंतर शासकीय यंत्रणेकडे धाव घेत शेतकऱ्यांनी पाटाच्या पाण्याची आस धरली. देवाळा बुद्रुक मुख्य कालवा व सबमॅनरचे अंतर्गत येत असलेल्या सर्व शेतकऱ्यांनी पंचायत समितीचे माजी सभापती चंदू मार्गोनवार, व माजी उपसभापती अमोल भाऊ चुधरी, भाजपाचे नेते व जूनगावचे उपसरपंच राहुल भाऊ पाल यांचेकडे धाव घेत पिक वाचवण्याची विनंती केली.
शेतकऱ्यांची आर्थ हाक ऐकून चंदू भाऊ मार्गोनवार व अन्य कार्यकर्ते नेत्यांनी यांनी संबंधित विभागाचे अभियंता श्री गायकवाड यांच्याशी संवाद आणि संपर्क साधून शेतकऱ्यांसाठी पर्यायी व्यवस्था करून देण्याची मागणी केली. माजी सभापती व उपसभापती अमोल भाऊ चुधरी यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे अभियंता गायकवाड यांनी प्रत्यक्षात समस्या जाणून घेतली आणि पाण्याची पर्यायी व्यवस्था सुरू करण्याची हमी दिली. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांना अंशिक दिलासा मिळाला आहे.
या सत्कार्यासाठी बोंडाळा बुजरूक चे सरपंच मुरलीधर जी चुधरी, बोंडाळा खुर्द येथील सामाजिक कार्यकर्ते नंदू भाऊ बांगरे, माजी सरपंच मुन्ना भाऊ कोटगले, संतोष भाऊ गडलावार, अतुल वाकुडकर, अनिल वाघरे, दिनकर पाटील बांगरे, आणि शेतकऱ्यांचे सहकार्य लाभले.
तूर्तास पाणी समस्या दूर झाल्यामुळे शेतकऱ्यांनी चंदू भाऊ मार्गोनवार ,अमोल भाऊ चुधरी आणि पदाधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत.
0 Comments