एसटी बसलाही रविवारी सुट्टी असते का हो?प्रवाशांचा संतप्त सवाल
जुनगाव:(अजित गेडाम)
एसटीला राज्याची जीवन वाहिनी समजले जाते आणि मानलेही जाते. सर्वसामान्यांच्या हक्काचे प्रवासाचे वाहन म्हणजे एसटी आहे. ग्रामीण भागात एसटी बसने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. शालेय विद्यार्थ्यांसाठी मानव विकास योजनेअंतर्गत बसेस सुरू आहेत. परंतु रविवारी पूर्णपणे बस सेवा बंद राहिल्याने संतप्त झालेल्या प्रवाशांनी इतर सुट्ट्यांप्रमाणे एसटी बसला आहे सुट्टी असते का? असा संतप्त सवाल प्रवाशांनी केला आहे.
सविस्तर वृत्त असे की, पोंभुर्णा ते जुनगाव अशी बस सेवा सुरू असून दिवसभरातून तीन बस सुरू आहेत. मात्र काल दिनांक 15 ऑक्टोबर 2023 रोजी रविवार असल्याने तीन पैकी एकही एसटीची बस आली नसल्याने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी एसटी महामंडळावर संताप व्यक्त करत असा खडा सवाल केला आहे. त्याचे उत्तर एसटी महामंडळाने प्रवाशांना द्यावे अशी मागणी ही त्यांनी केली आहे.
त्याचबरोबर चुकीच्या वेळापत्रकात सुधारणा करून नियमित बस सेवा सुरू ठेवावी अशी मागणी ही प्रवाशांनी केली आहे.
0 Comments