गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुका च्या लगत असलेल्या अल्लापल्ली शहरात रात्री ( रविवार सकाळी उघडकीस आली)एका युवकाची हत्या करण्यात आल्याची खळबळ जनक माहिती पुढे आली आहे.
राकेश कन्नाके वय 32 वर्ष असे हत्या करण्यात आलेल्या युवकाचे नाव असून तो आलापल्ली येथीलच रहिवाशी होता. जुनगाव येथील संजय गेडाम, माजी सरपंच जीवनदास गेडाम, संतोष गेडाम, डॉक्टर विलास गेडाम, यांचे ते जावई होते. त्यामुळे जूनगावातही नातेवाईकांमध्ये शोक कळा पसरल्याचे दिसून आले.
पुढील तपास सुरू असून वेळोवेळी अपडेट देण्यात येईल.
0 Comments