जिल्हा प्रतिनिधी धर्मपाल कांबळे. चंद्रपूर
घुग्घूस महोत्सव गरबा व दांडिया कार्यक्रम
घुग्घूस : संजीवनी बहुउद्देशिय संस्था तथा राजुरेड्डी मित्र परिवाराच्या वतीने दिनांक 27 ऑक्टोबर रोजी तुकडोजी नगर गाडगेबाबा मंदिर परिसरात भव्य गरबा व दांडीया कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष वरोरा भद्रावती विधानसभेचे आमदार प्रतिभाताई धानोरकर तर उदघाटक महिला काँग्रेस ग्रामीण जिल्हाध्यक्ष नम्रता ठेमस्कर या होत्या काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी यांच्या वतीने आमदार धानोरकर, जिल्हाध्यक्ष ठेमस्कर यांचे मानचिन्ह व पुष्पगुच्छ शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
आपल्या अध्यक्षीय संभाषणात धानोरकर यांनी महिलांना सक्रियपणे राजकारणात येण्याचे आवाहन केले तसेच महिलांवरील होणारे अत्याचार शोषणाची माहिती देण्याची विनंती केली. व महिलांच्या न्याय हक्कासाठी शेवटच्या श्वासा पर्यंत लढा देऊ अशी ग्वाही दिली.
माऊली माता मंदिर ग्रुप साईनगर,
उत्सवी ग्रुप बहिरम बाबा नगर,ए.एस.के ग्रुप सुभाष नगर, योगा ग्रुप गांधीनगर,तुकडोजी नगर महिला ग्रुप,रामनगर महिला ग्रुप व मोठ्या संख्येने महिलांनी कार्यक्रमात भाग घेतला.
कार्यक्रमात सहभागी स्पर्धकांना टिफिन बॉक्स भेट स्वरूपात देण्यात आले,
कार्यक्रमात प्रमुख अतिथी ज्येष्ठ नेते शामराव बोबडे, मुन्ना लोहानी,तिरुपती महाकाली,सुधाकर बांदूरकर,अलीम शेख,स्टीव्हन गुंडेटी,सुरज कन्नूर युवक काँग्रेस महासचिव,पिन्टू मंडल,देविदास चिलका,सुरेश खडसे,कल्याण सोदारी जिल्हा उपाध्यक्ष एस.सी.सेल, राजकुमार वर्मा,तालुकाध्यक्ष एस.सी.सेल,मोसीम शेख,शोभा ताई ठाकरे माजी सभापती कृ.उ.बा.स,संगिता बोबडे महिला शहर अध्यक्ष, दिप्ती सोनटक्के एस.सी.सेल महिला अध्यक्ष,यास्मिन सैय्यद जिल्हा उपाध्यक्ष,पदमा त्रिवेणी जिल्हा महासचिव,दुर्गा पाटील जिल्हा सचिव,पुष्पां नक्षीने जिल्हा महासचिव,संध्या मंडल,सरस्वती कोवे,पवन नागपूरे,रंगय्या पुरेल्ली,अनिरुद्ध आवळे,पवन नागपुरे,नक्षीने गुरुजी, उपस्थित होते
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सैय्यद अनवर यांनी केले तर सूत्र संचालन साहिल सैय्यद, देव भंडारी यांनी केले
नृत्य प्रशिक्षक रोशन आवळे,सहाय्यक प्रशिक्षक अरुण पेरका,कुणाल गेडाम,शिवा हे होतेे.
कार्यक्रमाच्या यशस्विते करिता रोशन दंतलवार सोशल मीडिया अध्यक्ष,विशाल मादर,युवा नेते अनुप भंडारी,आकाश चिलका एन.एस.यु.आय अध्यक्ष,रोहित डाकूर,सुनिल पाटील, सचिन नागपुरे,अरविंद चहांदे,इरशाद कुरेशी,सोमेश रंगारी,बालकिशन कुळसंगे,दिपक कांबळे,दिपक पेंदोर,विजय माटला, कपील गोगला,जाफर शेख,बल्ली भाई,कुमार रुद्रारप, अमित सावरकर,अंकुश सपाटे,संजय कोवे,रंजित राखुंडे आदीने अथक परीश्रम शेवट पर्यंत केले.
0 Comments