Ticker

6/recent/ticker-posts

रेती तस्करांचा गावकऱ्यांवर हल्ला! रेती तस्करांची कशी वाढली दादागिरी? जबाबदार कोण?



रेती तस्करांचा गावकऱ्यांवर हल्ला! रेती तस्करांची कशी वाढली दादागिरी? जबाबदार कोण?




जिवनदास गेडाम,
चंद्रपूर: (विशेष प्रतिनिधी)
जिल्ह्यात रेती तस्करांनी जणू हैदोस घातला आहे. मात्र महसूल प्रशासन अत्यंत डोळेझाक करत असल्यामुळे रेती तस्करांची दादागिरी विकोपाला गेली आहे. याचा ज्वलंत नमुना गोंडपिपरी तालुक्यात पहायला मिळाला.


गोंडपिपरी तालुक्यातील कुलथा घाटावर सरपंचासह तंटामुक्ती अध्यक्ष व महिला पदाधिकाऱ्यांवर रेती तस्करांकडून जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात सरपंचा सहित तंटामुक्ती अध्यक्ष व महिला पदाधिकारी गंभीर रित्या जखमी झाले असल्याची खळबळ जनक आणि तेवढीच संतापजनक घटना दिनांक 28 डिसेंबर रोजी बुधवारी रात्री एक वाजता च्या दरम्यान घडली.
तालुक्यातील तारडा गावचे सरपंच तरुण गंगाराम उमरे व तंटामुक्त समिती अध्यक्ष चंद्रशेखर सुधाकर लखमापूरे व काही महिला पदाधिकारी रेती घाटावर उपस्थित होऊन रेती तस्करी करणाऱ्यांवर आळा घालण्याचा प्रयत्न केला, मात्र गब्बर आणि निर्भय झालेल्या गुंड प्रवृत्तीच्या रेती तस्करांनी गावकऱ्यांवरच हल्ला चढवून त्यांना गंभीर जखमी केले.


तालुक्यात कुलथा घाटासह अनेक घाटावरून रात्रीच्या सुमारास जेसीबी आणि पोकलेन मशीनच्या सहाय्याने ट्रॅक्टरने स्टॉक तयार करून रेती उपसा केली जात आहे. मात्र प्रशासनाने रेती तस्करांसमोर नांगी टाकल्याचे चित्र दिसत आहे.

Post a Comment

0 Comments