पोंभूर्णा :- वेळवा माल ग्रामपंचायतीवर शिवसेना (उबाठा)ची सत्ता असून ठल्याप्रमाणे अडीच- अडीच वर्षासाठी सरपंचपदाची वाटाघाटी करून आज झालेल्या निवडणुकीत सरपंचपदी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे जितेंद्र मानकर यांची बुधवारी बिनविरोध निवड करण्यात आली.शिवसेना कार्यकर्त्यांनी मानकर यांची बिनविरोध निवड जाहीर करताच फटाके व गुलाल उधळत आपला आनंद साजरा केला.
वेळवा गट ग्राम पंचायतीच्या सरपंच सिमा निमसकार यांनी आपसात ठरल्याप्रमाणे आपल्या सरपंच पदाचा राजीनामा दिला होता.त्यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी बुधवारी ग्राम पंचायत वेळवा माल कार्यालयात सरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली.यावेळी सरपंच पदासाठी जितेंद्र मानकर यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी तथा पंचायत समितीचे विस्तार अधिकारी अमरदिप खोडके, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी ग्रामसेवक विकास तेलमासरे यांनी जितेंद्र मानकर यांची बिनविरोध निवड जाहीर केली.यावेळी सदस्य व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सरपंच पदी निवड झाल्यानंतर नवनियुक्त सरपंच यांनी शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे व शिवसेना तालुका प्रमुख आशिष कावटवार,गणेश वासलवार निलेश लोणारे यांच्या नेतृत्वाखाली व गावकऱ्यांनी दाखविलेल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ न देता गावच्या विकासासाठी सदैव प्रयत्न करेन अशी प्रतिक्रिया यावेळी नवनिर्वाचित सरपंच जितेंद्र मानकर यांनी दिली आहे.
यावेळी शिवसेना उबाठा चे तालुका प्रमुख आशिष कावटवार,शहर प्रमुख गणेश वासलवार ,नगरसेवक बालाजी मेश्राम,माजी सरपंच सीमा निमसकार, सदस्य अतुल जाधव, सुरेखा कुडमेथे, निता येरमे, ममता जाधव,रमेश कुडमेथे, समीर लोणारे, मुना लोणारे, वनवासू येरमे माजी सरपंच, मधुकर मेश्राम,विलास कामिडवार,अनिल निमसकार,भाऊजी कुडमेथे प्रशांत कावटवार,अनिल मडावी,सतीश लोणारे,विनोद खोब्रागडे,प्रशिक मानकरयांची उपस्थिती होती.
0 Comments