दोन्ही कुटुंबावर दुःखाचा डोंगर। आज होणार अंत्य संस्कार
जुनगाव (अजित गेडाम)
पोंभुर्णा तालुक्यातील घोसरी येथील एका सात महिन्यांच्या गर्भवती महिलेचा आकस्मिक मृत्यू झाल्याने दोन्ही कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. यामुळे चार वर्षीय चिमुकली आईविना पोरकी झाली आहे.
घोसरी येथील महेश गुणशेटीवार यांची पत्नी सौ. दिपाली वय 26 वर्ष ही काल अचानक आजारी झाली. तात्काळ तिला उपचारार्थ दवाखान्यात नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान दुर्दैवाने तिच्या मृत्यू झाला. एका जीवा सोबत उदरात असलेला दुसराही जीव देवाला प्रिय झाला. त्यामुळे परिसरात आणि गावात प्रचंड हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
दरारा 24 तास तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली
त्यांचेवर आज दिनांक 17 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी तीन वाजता अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत.
0 Comments